भालोद परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:59+5:302021-06-25T04:12:59+5:30
भालोद, ता. यावल : भालोदसह परिसरातील शेतकरी वर्गाने खरीप पिकांची ७० टक्के पेरणी केलेली असून वरुणराजाने पाठ फिरविल्याने ...
भालोद, ता. यावल : भालोदसह परिसरातील शेतकरी वर्गाने खरीप पिकांची ७० टक्के पेरणी केलेली असून वरुणराजाने पाठ फिरविल्याने उर्वरित खरीप पिकांची पेरणी बळीराजाने थांबविली आहे. सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दमदार पावसाचे आगमन झाल्यावरच उर्वरित खरीप पिकांच्या पेरणीची कामे होणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
अगोदरच निसर्गाची योग्य साथ गेल्या दोन-तीन वर्षापासून मिळत नसल्याने शेतकरी वर्गास खरीप पिकांच्या उत्पन्नामध्ये मोठी कमालीची घट निर्माण होत असते. मिळालेल्या उत्पन्नाला हमीभावसुद्धा मिळत नाही. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढतच आहेत. बी-बियाणे यांच्याही किमती भरमसाट वाढल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झालेल्या बळीराजाच्या पदरी शेवटी निराशाच आल्याने मोठ्या संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.