जळगाव जिल्ह्यातील १२ शाळांना शिक्षकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:19 PM2018-06-23T12:19:20+5:302018-06-23T12:22:07+5:30

४५ शिक्षक अतिरिक्त

Waiting for teachers 12 schools | जळगाव जिल्ह्यातील १२ शाळांना शिक्षकांची प्रतीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १२ शाळांना शिक्षकांची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देशैक्षणिक सत्र सुरु होऊन आठवडा उलटला तरी शिक्षक नाही८ शाळा उर्दू माध्यमाच्या

जळगाव : जिल्हाभरातील तब्बल ३३०० शिक्षकांच्या बदल्या गेल्या महिन्यात आॅनलाईन पध्दतीने करण्यात आल्या. मात्र शैक्षणिक सत्र सुरू होऊनदेखील बदल्यांचा घोळ कायम असल्याचे चित्र आहे. एकीकडे बदली प्रक्रीयेत ४५ शिक्षक अतिरीक्त ठरले आहे तर दुसरीकडे शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी १२ शाळांना एकही शिक्षक नसून या शाळांना शिक्षकांची प्रतीक्षा आहे. आठवडाभरात या शाळांना शिक्षक रुजू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आॅनलाईन बदली प्रक्रीयेत जिल्ह्यातील शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या असून ते रुजूदेखील झाले विस्थापित शिक्षकांनादेखील नव्याने पदस्थापना मिळाल्या आहे. मात्र दोन वेळा आदेश बदलवूनदेखील बदल्यांमधील घोळ कायम आहे. ज्या शाळांमध्ये तीन शिक्षकांची आवश्यकता असताना चार शिक्षक मिळून एक शिक्षक शिक्षक अतिरिक्त आहे. अशाच पध्दतीने काही शाळांना तब्बल ४५ शिक्षक अतिरीक्त झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या अतिरीक्त शिक्षकांना रिक्त असलेल्या शाळांवर पदस्थापना देण्याचा प्रस्ताव पाठविला असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले. आठवडाभरात या शिक्षकांना पदस्थापना मिळणार आहे.
१५ जून पासून शाळा सुरू झाल्या असताना आठवडा उलटूनही १२ शाळांना शिक्षक मिळालेले नाही. प्राप्त माहीतीनुसार यात ८ शाळा उर्दू माध्यमाच्या असून ४ शाळा मराठी माध्यमाच्या आहे. या १२ शाळा एक शिक्षकी शाळा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Waiting for teachers 12 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.