बसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 08:05 PM2018-08-21T20:05:49+5:302018-08-21T20:06:34+5:30
डोक्याला गंभीर दुखापत
जळगाव : वरखेडी तांड्याकडून पहूरकडे जाणाऱ्या दुचाकीस बसने कट मारल्याने तोल जाऊन बापू नारायण राठोड (३५, वाकोद ता.जामनेर) हे रस्त्यावर पडून जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वरखेडी तांड्याजवळ घडली, जखमीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बापू राठोड (३५) हे काही कामानिमित्त वरखेडी तांडा येथे दुचाकीने गेलेले होते. काम आटोपून ते पहूरकडे जात असताना वरखेडी तांडा-सोयगाव या बसने दुचाकीस कट मारला. यात दुचाकीवरील बापू राठोड हे रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या भावाने १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावरअतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.