पहाटे अर्धा तास चाला, दिवसभर तणावमुक्त रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:21 PM2019-11-20T22:21:45+5:302019-11-20T22:21:56+5:30
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचा संदेश : उद्यानांमध्ये गर्दी वाढली; वॉकिंग विथ टॉकिंगमुळे भेटतात नवे मित्र
जळगाव : पहाटे किमान अर्धा तास चालण्याने तुम्ही अनेक व्याधी, तणावापासून दूर राहू शकतात़ कुठलाही व्यायाम शक्य नसेल तरी किमान चालण्याने तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते़़़ अशाच प्रकारे जळगावकरही आरोग्य जपण्यासाठी, दिवसभराचा उत्साह टिकविण्यासाठी पहाटे चालण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे़ त्यात हिवाळा सुरू झाला असून सध्या पहाटे जॉगिंग ट्रॅक, अनेक रस्ते, उद्याने या मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी फुल्ल झालेली दिसतात़़ तेव्हा तुम्हीही सकाळी लवकर उठा चाला व तणाव, थकवा, व्याधी दूर पळवा़़ असा संदेशच या आरोग्य प्रेमींनी दिला आहे़़क़ेवळ आरोग्यच नव्हे, नवे मित्रही यातून भेटतात़़.
ही ठिकाणे आहेत जॉगिंग पॉर्इंट
मेहरूण तलाव परिसर, रेल्वे मालधक्का, भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान, बहिणाबाई उद्यान, अयोध्यानगरातील रस्ते, उद्यानं, पिंप्राळा रोड, काव्यरत्नावली चौक, मोहाडी रोड, निमखेडी रस्ता, गिरणा पंपीग रस्ता, कोल्हे हिल्स परिसर ही प्रचलीत ठिकाणे तर आहेच मात्र, रस्त्यारस्त्यांवर सकाळी सकाळी मॉर्निग वॉकला येणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे़
उद्यानात वॉकिंग विथ टॉकिंग
आरोग्यासाठी फिरणे होतेच शिवाय शहरातील वेगवेगळ्या ठिकाणची मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन मस्त गप्पा करून सर्व ताणतणाव विसरतात, हसतात, यात मनोहर वर्मा, श्याम सराफ, किरीट सोनी, प्रमोद पाटील, अर्जुन नलावडे, देवकुमार पगारिया यांचा ग्रुप नियमित फिरण्यासाठी येत असतो.
पहाटे चालण्याचे फायदे
-पहाटे चालल्याने दिवसभर मुड फ्रेश राहतो़
-कॅलरीज बर्न होण्यास मदत होते़
-नियमित सकाळी चालल्याने पचनक्रिया सुधारते
-मन एकाग्र राहते़
-पाठीचे दुखणे, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, श्वसनाच्या त्रासावर नियंत्रण मिळविता येते़
-दररोज एक तास चालल्यास संधीवाताचा त्रास कमी होऊ शकतो़
-तणावापासून तुम्ही दूर राहतात़
-कामात थकवा जाणवत नाही़