प्रवाशाचे सापडलेले पैशांचे पाकीट आगारात सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:17+5:302021-08-01T04:17:17+5:30
सखी श्रावणी संस्थेतर्फे वृक्षारोपण जळगाव : शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व ग्लोबल फाउंडेशनतर्फे स्वामी समर्थ केंद्रात नुकत्याच ...
सखी श्रावणी संस्थेतर्फे वृक्षारोपण
जळगाव : शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व ग्लोबल फाउंडेशनतर्फे स्वामी समर्थ केंद्रात नुकत्याच विविध प्रकारच्या ३० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा नेवे, स्मिता माहुरकर, प्रियंका नेवे, रसिका माहुरकर, गिरीश नेवे, जयश्री पाटील, वैभव नेवे ,मनोज भदाणे, दीपक मोराडे,राहुल पाटील, विलास नेवे उपस्थित होते.
बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील तहसील कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक रस्त्यावरच आपल्या दुचाकी पार्किंग करत असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहर वाहतूक विभागाने येथील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
गटारीच्या कामामुळे व. वा. वाचनालयाकडे जाणारा रस्ता बंद
जळगाव : गोलाणी मार्केट समोरून व. वा. वाचनालयाकडे जाणारा अंतर्गंत रस्ता गटारीच्या कामामुळे दोन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना स्टेशनकडून फिरून व. वा. वाचनालयाकडे जावे लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, गटारीचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे.