वाळूमाफिया उठले जिवावर तहसीलदाराच्या अंगावर गाडी

By admin | Published: January 30, 2016 12:35 AM2016-01-30T00:35:36+5:302016-01-30T00:35:36+5:30

नवापूरची घटना : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Wallymafia woke up on the tahsildar's car | वाळूमाफिया उठले जिवावर तहसीलदाराच्या अंगावर गाडी

वाळूमाफिया उठले जिवावर तहसीलदाराच्या अंगावर गाडी

Next

नवापूर : अवैध वाळू उपसा करणा:यांवर कारवाई केल्याचा राग येऊन नवापूरचे तहसीलदार संदीप भोसले यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. तिघांविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करंजवेल शिवारात अरवणी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार भोसले हे पथकासह करंजवेल येथे पोहचले. तेथे त्यांनी कारवाई करीत चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरील कारवाई पूर्ण केल्यानंतर तहसीलदार भोसले हे गुजरातमधील व्यावरघाटमार्गे परत येत असताना ही घटना घडली. तिघांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत.

रात्री साडेनऊची घटना

रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास तीनटेंभानजीक सिल्व्हर रंगाची चारचाकी (क्रमांक एमएच 43 व्ही 7557) त्यांच्या वाहनापुढे येऊन थांबली.

त्यातील सुमन आसू गावीत, रमण आसू गावीत रा.जामतलाव व धना रुबजी गावीत रा.मोरथुवा यांनी कारवाई करू नका, अन्यथा तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिली.

त्यानंतर वाहन भरधाव नेत भोसले यांच्या अंगावर घालण्याचा प्रय} केला.

त्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजुला उडी मारली. त्यानंतर पुन्हा परत येवून त्यांच्या वाहनाला कट मारला.

यामुळे तहसीलदार संदीप भोसले यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

Web Title: Wallymafia woke up on the tahsildar's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.