समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन- भाऊराव महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 07:36 PM2020-05-30T19:36:28+5:302020-05-30T19:45:13+5:30

मतीन शेख मुक्ताईनगर , जि.जळगाव : समाजातील समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन करण्यात येत असल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य ...

Warakaris' organization to solve the problem - Bhaurao Maharaj | समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन- भाऊराव महाराज

समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन- भाऊराव महाराज

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत मंडळाचे कार्यक्षेत्र अखिल भारत स्तरावर

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : समाजातील समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन करण्यात येत असल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य कोषाध्यक्ष तथा मुक्ताईनगरचे रहिवासी ह.भ.प. भाऊराव महाराज पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भूमिपुत्र म्हणून गेल्या २९ वर्षांपासून शिक्षकी पेशा सांभाळत राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश येथेही ते कीर्तन सेवा देतात. संतांची शिकवण तिमिरातूनी तेजाकडे नेणाºया आध्यत्मिक कार्यातूून मानवी जीवनात सकारात्मक बदल घडविते ते कार्य वारकरी धुरंदर पुढे नेत आहे. त्यांच्या विचारांचा पगडा घेऊन भाऊराव महाराज कार्य करीत आहेत. त्यांची नुकतीच वारकरी मंडळावर निवड झाली. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : वारकरी मंडळाचे नेमके काम काय असते?
उत्तर : अखिल भारतीय वारकरी मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून देशात कार्यरत आहे. या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले व प्रदेश अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाने मंडळामार्फत अनेक कार्य केले जातात. मुख्य म्हणजे संतांनी दिलेल्या शिकवणीतून समाज मनावर संस्कार करण्यासाठी संघटन आवश्यक असते. या मंडळाच्या माध्यमातून वारकºयांना एकत्रित करून वारकरी संप्रदायातील संतांचे विचार, त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सर्व महाराज मंडळी कीर्तन सप्ताहाचे आयोजन करतात. २००८ ला देहू येथे ४ लाख लोकांना एकत्रित करून तुकाराम गाथा पारायण केले. २०१५-१६ मध्ये आळंदीला १ लाख लोकांचे ज्ञानेश्वरी पारायण केले. तसेच दिल्ली येथे रामलीला मैदानावरसुद्धा गाथा पारायण केले. असे अनेक अध्यात्मिक कार्यक्रम या मंडळमार्फत केले जातात. विविध प्रकारच्या सामाजिक समस्या सोडवणसाठी कार्यशाळासुद्धा शासनाच्या सहकायार्ने आयोजित केल्या जातात. जसे कुपोषण निर्मूलन, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, झाडे लावा झाडे जगवा शिक्षण इत्यादी.
प्रश्न : मंडळाचा उद्देश काय?
उत्तर : मंडळाचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक स्तरावर उद्भवणाºया अनेक समस्या सोडवण्यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी वारकºयांचे संघटन करणे, समाज प्रबोधनातून सुदृढ, सकारात्मक समाज निर्मिती आणि आध्यत्मिक सेवा देणे, त्याचप्रमाणे समाजातील विविध कला गुण असणाºया व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणे, दरवर्षी आळंदी येथे माऊलींच्या समाधी सोहळ्याला पुरस्कार वितरण करण्यात येते. त्यात महिला व पुरुष असे दोन गट आहेत. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करणे, वारकºयांसाठी शासनाच्या असलेल्या योजनेचा वारकºयांना लाभ मिळवून देणे अशा अनेक स्तरावर हे मंडळ कार्य करते.
प्रश्न : मंडळाचे कार्यक्षेत्र कुठपर्यंत
उत्तर : या मंडळाचे कार्यक्षेत्र हे अखिल भारत स्तरावर आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मंडळाचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, मध्यप्रदेश ई.राज्यात मंडळाचे कार्य जोमात सुरू आहे.
प्रश्न : सध्या कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे. तो रोखण्यासाठी वारकरी स्तरावर काय करता येऊ शकते? वारकरी पंथात यावर काही उपाय योजना आहेत का?
उत्तर : सध्या साºया जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कायद्याने समाजमन लवकर वळत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे. कारण शासनापेक्षा लोकांची श्रद्धा अध्यात्मा आणि कीर्तनकारावर जास्त आहे. म्हणून ते होणे गरजेचे आहे. मंडळाचे बरेच कीर्तनकार समाजातील दानशूर मंडळींच्या मदतीने गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सध्या करत आहेत.
कोरोना थांबवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, घरीच थांबणे असे अनेक उपाय करता येतील हे शासन सांगते आहे पण लोक त्याकडे पाहिजे तेव्हढे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येक तालुक्यात असलेल्या वारकºयांनी गावागावात या प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.

Web Title: Warakaris' organization to solve the problem - Bhaurao Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.