प्रभाग समिती सभापती निवड १२ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:59+5:302021-07-07T04:20:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील चारही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठीची निवड प्रक्रिया १२ जुलै रोजी पार पडणार आहे. यासाठी ...

Ward committee chairperson election on 12th | प्रभाग समिती सभापती निवड १२ रोजी

प्रभाग समिती सभापती निवड १२ रोजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपातील चारही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठीची निवड प्रक्रिया १२ जुलै रोजी पार पडणार आहे. यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत असतील. भाजपमधील बंडखोरांमुळे विस्कटलेल्या गणितामुळे मनपातील चारही प्रभाग समित्याही भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी ५७ जागा असलेल्या भाजपकडे आता केवळ २७ नगरसेवक शिल्लक आहेत. भाजपमधून फुटून नवीन गट स्थापन करणाऱ्या ३० बंडखोरांमुळे आता १२ रोजी होणाऱ्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत चारही प्रभाग समित्यांवर बंडखोर व शिवसेनेचेच सभापती विराजमान होण्याची शक्यता वाढली आहे. १२ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडप्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

सर्व प्रभाग समित्या काबीज करण्याची सेनेची रणनीती

भाजपची सत्ता महापालिकेत असताना एकाही प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचा सभापती होणार नाही यासाठी भाजपने नव्याने प्रभाग समितीमधील वॉर्डांची रचना केली होती. या नवीन रचनेनुसार सत्ताधारी भाजपने एकही प्रभागात शिवसेनेचा सभापती होऊ दिला नव्हता. आता शिवसेनेनेदेखील भाजपने तयार केलेल्या रचनेनुसारच भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावण्याची रणनीती आखली आहे. काही महिन्यांपूर्वी मनपातील सर्वच प्रभाग समित्यांमध्ये भाजपला बहुमत होते. मात्र, बंडखोरांमुळे भाजपचे कोणत्याही प्रभाग समितीमध्ये बहुमत नाही.

प्रभाग समिती ३ मध्ये एमआयएम निश्चित करणार सभापती

प्रभाग समिती १ मध्ये शिवसेना व बंडखोर मिळून एकूण २० पैकी १५ नगरसेवक आहेत, तर भाजपकडे केवळ चार जागा आहेत. प्रभाग समिती दोन मध्येदेखील भाजपकडे केवळ सात जागा असून, सेना व बंडखोरांकडे १३ जागा आहेत, तर प्रभाग समितीमध्ये भाजपकडे सर्वाधिक नऊ जागा असल्या तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १० जागा भाजपकडे नाहीत. याच प्रभाग समितीमध्ये सेना व बंडखोरांकडे सात जागा आहेत, तर एमआयएमकडे ३ जागा असून, या प्रभागात सभापतिपदासाठी आवश्यक बहुमतासाठी एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे एमआयएम कोणाच्या बाजूला जाते याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग समिती ४ मध्येदेखील शिवसेना व बंडखोरांच्या मिळून १० जागा असून, याठिकाणीही भाजपचा सभापती होणे कठीण आहे.

अशी करण्यात आली प्रभाग समिती रचना

प्रभाग समिती १- प्रभाग क्रमांक १, २, ५, ७, ८

प्रभाग समिती २- प्रभाग क्रमांक ३, ४, १५, १६, १७

प्रभाग समिती ३- प्रभाग क्रमांक ६, १३, १४, १८, १९

प्रभाग समिती ४- प्रभाग क्रमांक ९, १०, ११, १२

प्रभाग समितीनुसार पक्षीय बलाबल

प्रभाग समिती १ -बंडखोर १०, शिवसेना ५, भाजप ५

प्रभाग समिती २ -बंडखोर ९, शिवसेना ४, भाजप ७

प्रभाग समिती ३ - भाजप ९, शिवसेना ४, बंडखोर ३, एमआयएम ३,

प्रभाग समिती ४ -भाजप ६, बंडखोर ८, शिवसेना २

Web Title: Ward committee chairperson election on 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.