आजपासून प्रभागनिहाय जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:39 PM2020-07-20T12:39:23+5:302020-07-20T12:39:49+5:30

जळगाव : जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे २० जुलैपासून आठवडाभर टप्प्याटप्प्याने जनता कर्फ्यू राबविण्यात येणार ...

Ward wise public curfew from today | आजपासून प्रभागनिहाय जनता कर्फ्यू

आजपासून प्रभागनिहाय जनता कर्फ्यू

googlenewsNext

जळगाव : जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे २० जुलैपासून आठवडाभर टप्प्याटप्प्याने जनता कर्फ्यू राबविण्यात येणार आहे. हा कर्फ्यू मनपाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी करणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.
वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या आठवड्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. सद्यस्थितीत जळगाव शहरात रूग्ण संख्या दोन हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे मनपाने शहरातील १९ प्रभागात जनता कर्फ्यू लागू करण्याचे नियोजन केले आहे. सोमवार दि.२० पासून ते रविवार दि. २६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. कर्फ्यूच्या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक गोष्टीसाठींच बाहेर पडावे. तसेच व्यावसायिकांनी वेळापत्रकानुसार कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.

आज या प्रभागामध्ये जनता कर्फ्यू

-राजमालतीनगर, महावीर नगर, राधाकृष्णनगर, इंद्रप्रस्थनगर, सिटी कॉलनी, हरिओमनगर, के. सी. पार्क परिसर, गजानन नगर, काळे नगर, लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल परिसराचा भाग.

- शिवाजीनगर, शिवाजीनगर हुडको, आर. वाय. पार्क, उमर कॉलनी, के. जी. एन. पार्क, उस्मानिया पार्क, बारसे कॉलनी, प्रजापतनगर, कालिका माता मंदिर, कांचननगर, प्ले सेंटर भाग परिसर, जैनाबाद घरकुुल परिसर.

-वाल्मिक नगर, तानाजी मालुसरे नगर, मेस्को मातानगर, दिनकर नगर, जुने जळगाव, आंबेडकरनगर, जुना असोदा रोड, ज्ञानदेव नगर, योगेश्वर नगर, खेडीगाव व परिसर.
 

Web Title: Ward wise public curfew from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.