वर्धा-भूसावळ व बडनेरा-नाशिक मेमू गुरुवारी रद्द; कारण...
By Atul.jaiswal | Published: August 7, 2024 07:38 PM2024-08-07T19:38:27+5:302024-08-07T19:38:55+5:30
शेगाव-जलंब मार्गावर तांत्रिक काम : चार गाड्या विलंबाने धावणार.
अतुल जयस्वाल, अकोला: मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागात शेगाव आणि जलंब स्टेशनांमधील स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगच्या कामासाठी गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. या कामामुळे भूसावळ-वर्धा व बडनेरा-नाशिक मेमू गाड्या रद्द झाल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. या गाड्या अकोला मार्गे धावणाऱ्या असल्यामुळे अकोलेकर प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
रद्द झालेल्या गाड्या
१११२१ भुसावळ - वर्धा मेमू (८ ऑगस्ट)
१११२२ वर्धा - भुसावळ मेमू (९ ऑगस्ट)
०१२११ बडनेरा - नाशिक रोड स्पेशल (८ ऑगस्ट)
०१२१२ नाशिक रोड - बडनेरा स्पेशल (८ ऑगस्ट)
विलंबाने धावणाऱ्या गाड्या
२०८२० ओखा - पुरी एक्सप्रेस (७ ऑगस्ट, १ तास ३० मिनिटे)
११०४० गोंदिया - कोल्हापूर एक्सप्रेस (८ ऑगस्ट, १ तास १० मिनिटे)
१२४८५ नांदेड - श्री गंगानगर एक्सप्रेस (८ ऑगस्ट, ३० मिनिटे)
०१३६६ बडनेरा - भुसावळ मेमू (८ ऑगस्ट, ४५ मिनिटे)