आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:39 AM2020-05-23T10:39:18+5:302020-05-23T10:49:04+5:30

आषाढी वारी दिंडीत प्रतिनिधी म्हणून वारकऱ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे.

Warkaris should get admission in the form of Dindi representatives in Ashadi Wari | आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा

आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा

googlenewsNext
ठळक मुद्देवारकऱ्यांच्या भावना आणि परंपरा यांचा आदर करावावारकरी मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची मागणी


फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे (फैजपूर) यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारकरी संप्रदायाचे आराध्यदैवत श्री पांडुरंगाची आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी भरत असते. अनेक पिढ्यानपिढ्या पायी दिंडीच्या माध्यमातून लाखो वारकरी पायी चालत भक्तीसुखाचा आनंद घेत पंढरपूर येथे येऊन ही उपासना व साधना परंपरा जोपासली आहे. यावर्षी कोरोना रोगाचा प्रसार व महामारीचे आलेले संकट लक्षात घेता व जनहितार्थ गर्दी होऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे वारी भरणे अश्यक्य वाटत आहे. परंतु वारी परंपरा जोपासणे व आपली साधना खंडित न होता अखंडित राहणे हेसुद्धा संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याकरिता शासनाने मध्यम मार्ग काढून द्यावा. केवळ पायी दिंडीचे परंपरेचे प्रत्येकी १० प्रतिनिधी यांना आषाढ शु. चतुर्थी ते पौर्णिमा या दहा दिवसांच्या वारीच्या कालावधीत वेळ दिवस निश्चित करून द्यावा. त्यावेळेत वारकरी पंढरपूर येथे आपापल्या वाहनाने जाऊन सर्वांच्या वतीने वारी करून येतील. याबाबत जिल्हावार नियोजन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रीतसर सर्व अटी शर्तीची पूर्तता करून परवानगी द्यावी. वारकरी प्रशासनाचे सर्व नियम पाळतील. दहा दिवस व प्रत्येक दिवसात सोळा तास या नियोजनानुसार पंढरपूर येथे कोणतीही गर्दी होणार नाही. शासनाने वारकरी समुदायाच्या भावनांचा व परंपरांचा आदर राखून तत्काळ नियोजन जाहीर करावे व रीतसर परवानगी मिळावी, अशी विनंती दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केली आहे.

Web Title: Warkaris should get admission in the form of Dindi representatives in Ashadi Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.