वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:57+5:302021-05-17T04:14:57+5:30
राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे सावट असल्याने काही जिल्ह्यांना या वादळाचा धोका वर्तविला जात आहे. यामध्ये जळगाव जिल्हा नसला तरी नाशिक ...
राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे सावट असल्याने काही जिल्ह्यांना या वादळाचा धोका वर्तविला जात आहे. यामध्ये जळगाव जिल्हा नसला तरी नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वादळाचे संकट ओढवले तरी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीदेखील निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जाणवला होता. यामध्ये केळीसह अनेक पिकांचे नुकसान झाले होते. आतादेखील या तौक्ते वादळाचा जिल्ह्याला फटका बसणार नसल्याचे सांगितले जात असले तरी रविवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे यावल, रावेर, चोपडा, जळगाव या तालुक्यात केळीच्या पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात रविवारी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नसली तरी सोमवारी ही माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.