माहिती न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:15+5:302021-06-29T04:13:15+5:30

गेल्या पाच वर्षांत गावात समाधानकारक विकास दिसत नसल्याने मेलाणे गावातील तरुणांनी सरपंच व ग्रामसेवक यांना याबाबत जाब विचारला असता ...

Warning to go on hunger strike if no information is received | माहिती न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा

माहिती न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा

Next

गेल्या पाच वर्षांत गावात समाधानकारक विकास दिसत नसल्याने मेलाणे गावातील तरुणांनी सरपंच व ग्रामसेवक यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत इ. ग्राम स्वराज या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाहिले असता विकासकामे व खर्च केलेली रक्कम यात खूप तफावत आढळत असल्याचे प्रताप खाज्या पावरा यांची तक्रार आहे.

तरी प्रताप खाज्या पावरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती अधिकार या कायद्याच्या वापर करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, ग्रामसेवक अशोक पाडवी यांनी माहीती देण्यास टाळाटाळ केली असल्याने गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील अर्ज केला असून न्याय न मिळाल्यास आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा मेलाणे ग्रामस्थांसह प्रताप पावरा यांनी दिला आहे.

Web Title: Warning to go on hunger strike if no information is received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.