दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:42+5:302021-07-19T04:12:42+5:30
नितीन लढ्ढा यांचे नवे संपर्क कार्यालय जळगाव - शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी खान्देश कॉम्पलेक्स ...
नितीन लढ्ढा यांचे नवे संपर्क कार्यालय
जळगाव - शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी खान्देश कॉम्पलेक्स परिसरात नवीन संपर्क सुरु केले असून, या कार्यालयाचे उदघाटन आषाढी एकादशीला केले जाणार आहे. शहरात आमदार सुरेश भोळे व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याव्यतिरीक्त कोणत्याही नेत्याचे संपर्क कार्यालय नसून, नितीन लढ्ढा यांनी नवीन संपर्क कार्यालय सुरु केल्यामुळे चर्चांना उधान आले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी तर नाही ? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे. दरम्यान, हे कार्यालय लढ्ढा यांच्या प्रभाग क्रमांक ५ मध्येच असल्याने या प्रभागातील नागरिकांच्या सोईसाठी हे कार्यालय सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी चर्चा मात्र विधानसभेच्या तयारीचीच सुरु आहे.
आस्थापना अधीक्षकांविरोधात तक्रार
जळगाव : महापालिकेचे आस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे हे नागरिकांना लागणाऱ्या माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असून, नागरिकांशी उध्दटपणाने वागत असल्याची तक्रार भगतसिंग महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे निवेदन देखील देण्यात आले आहे.
मनपाने मागितली मुदत
जळगाव : महापालिकेने बजावलेल्या लाखो रूपयांच्या बिलांच्या विरोधात १५० पेक्षा जास्त गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात ८४ गाळेधारकांच्या दाव्यात दाव्याला उशिर केल्याने गाळेधारकांची विलंब माफ करण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. याबाबत शुक्रवारी झालेल्या कामकाजात महापालिकेने मुदत मागितल्याने आता २८ रोजी कामकाज होणार आहे.