धनादेश अनादरप्रकरणी कारखान्याच्या संचालकांना वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:07 AM2019-02-21T00:07:52+5:302019-02-21T00:08:06+5:30

न्यायालयात खटले

Warrant to Directors of the factory for dishonest defraudation | धनादेश अनादरप्रकरणी कारखान्याच्या संचालकांना वॉरंट

धनादेश अनादरप्रकरणी कारखान्याच्या संचालकांना वॉरंट

Next

चोपडा : चहार्डी, ता.चोपडा येथील सहकारी साखर कारखान्यात गेल्या हंगामावेळी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतक-यांना उसाचे धनादेश देऊन धनादेश अनादर झाल्याप्रकरणी जवळपास पन्नास ते पंचावन्न शेतक-यांनी चोपडा येथील न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी खटले दाखल केलेले आहेत. त्या खटल्यांची सुनावणी सुरू झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून दररोज एक किंवा दोन शेतकºयांचा खटला सुनावणीसाठी आल्याने संचालक मंडळातील चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्यासह सर्व संचालकांना न्यायालयात हजर राहावे लागत आहे. मात्र २० रोजी काही संचालक न्यायालयात गैरहजर असल्याने त्यांना न्यायालयाने वॉरंट बजावलेले आहे.
सध्या न्यायालयात शेतकºयाचा धनादेश अनादर प्रकरणी खटला सुनावणीसाठी सुरू झाल्याने चेअरमन अतुल ठाकरे व व्हा. चेअरमन शशिकांत देवरे यांच्यासह सर्व संचालकांना न्यायालयात हजर राहावे लागत आहे. तर जे संचालक न्यायालयात हजर नव्हते अशा जवळपास तीन ते चार संचालकांना न्यायालयाने वॉरंट बजावले असल्याचे खात्रीलायक वृत्त समजले आहे. मात्र चोसाकाचे वकील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यामुळे कोणत्या संचालकांना वॉरंट बजावलेला आहे त्यांचे नावे समजू शकलेली नाहीत.
चोसाकाकडे गेल्या हंगामात ऊस पुरवठा करणाºया शेतकºयांचे ऊसाचे पैसे दोन कोटी ४४ लाख रुपये घेणे असल्याने चोसाका चेअरमन यांनी सर्व शेतकºयांना त्यांच्या उसाच्या रकमेएवढे धनादेश दिलेले होते. मात्र शेतकºयांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी टाकला असता ते वटले नाहीत. तर धनादेशाचा अनादर झाला म्हणून काही शेतकºयांनी चोपडा न्यायालयात पैसे मिळण्यासाठी व धनादेश अनादर प्रकरणी धाव घेतली आहे.

Web Title: Warrant to Directors of the factory for dishonest defraudation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव