हमी भाव जाहीर झाले, ते पदरी पडतील का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:00 PM2019-07-05T12:00:00+5:302019-07-05T12:05:08+5:30
शेतकऱ्यांचा सवाल
जळगाव : केंद्र सरकारने खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी ती कधीही मिळालेली नाही. वर्षानुवर्षापासून असेच सुरू असल्याने त्या बाबत शाश्वती नाही. त्यामुळे यंदाही हमी भाव जाहीर झाले असले तरी ते पदरी पडतील की नाही, असा सवाल शेतकरी, शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.
केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षासाठी खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली. यात तेलबिया व्यतिरिक्त सर्व पिकांची किंमत ही प्रतिक्विंटल ६० ते २०० रुपये वाढ झाली. १९६६-६७ पासून आतापर्यंत साधारणपणे दरवर्षी २ ते ३ टक्केच वाढ देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या तुलनेत दरवर्षी रासायनिक खते, वीज, वाहतूक मजुरीचे दर वर्षाला किमान १० ते १५ टक्के वाढत आहेत. यात घट कधीच झाली नाही. म्हणजेच दरवर्षी १० ते १२ टक्के उत्पादन खर्च हा किमान आधारभूत किंमत पेक्षा जास्त होत आहे व शेती ही तोट्यात जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तरी कृषी मंत्री उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के भाव जास्त जाहीर केला, असे म्हणत असले तरी ही बाब खोटी तर आहेच, सोबतच शेतकºयांचा अपमान करणारीदेखील असल्याचा आरोप या निमित्ताने केला जात आहे.
हमी अंमलबजावणी होणे गरजेचे
सरकारने शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्याची योजना म्हणून हे भाव जाहीर केले. मात्र या हमी भावांची अंमलबजावणी होत नाही, हे दु:ख असल्याचाही सूर शेतकरी, व्यापाºयांमधून आहे. सरकार एकीकडे हमी भाव जाहीर करते व दुसरीकडे विदेशातून मालाची आयात करते. त्यामुळे शेतीमाला भाव कसा मिळू शकतो, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत ५० ते २०० टक्के नफा देऊन भाव जाहीर केल्याचे कृषिमंत्री सांगत असले तरी हा शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. शेतकºयांनी ज्या विश्वासार्हतेने भाजप सरकारला निवडून दिले त्यांनीच शेतकºयांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केली आहे. सोबतच ज्यांना शेती कळत नाही त्यांच्या मनात शेतकºयाविषयी गैरसमज पसरविण्याच प्रकार आहे.
- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती.
सरकार हमी भाव वाढवून देते, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. दीर्घ काळाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मात्र जाहीर झालेला हमी भाव शेतकºयास मिळाला पाहिजे. दरवर्षी त्यापेक्षाही भाव कमी मिळतात. त्यासाठी बाजारपेठ व जाहीर हमी भाव यांची योग्य सांगड घातली गेली पाहिजे.
- प्रेम कोगटा, डाळ उद्योजक.
हमी भाव जाहीर होतात. मात्र बाजारपेठेत प्रत्यक्ष हे भाव पोहचत नाही. त्यामुळे व्यापाºयांनाही त्रास होतो. याकडे सरकारने लक्ष द्यावे.
- शशी बियाणी, व्यापारी.
एकीकडे हमी भाव जाहीर होत असले तरी बाजारपेठेतील तफावत पाहता शेतकºयांना तेवढा भाव मिळत नाही. यात बºयाच वेळा व्यापाºयांनाही नुकसान सहन करावे लागते. योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
- संजय शहा, व्यापारी.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव पाहता हमी भाव जाहीर झाले तरी ते शेतकºयांना मिळत नाही. बाजारपेठेतील भावाशी त्याचा ताळमेळ असावा. तरच शेतकºयांना त्याचा लाभ होईल.
- स्वप्नील चौधरी, शेतकरी.
हमी भाव जाहीर झाल्यानंतर त्याच भावात शेतीमाल खरेदी होण्यासाठी यंत्रणा असावी. तरच त्याचा लाभ होऊ शकेल. फळ पिकांबाबतही विचार होणे गरजेचे आहे.
- डॉ. सत्वशील जाधव, शेतकरी.