चाळीसगावला एक लाख २० हजाराची लाच घेतांना वनसंरक्षकास रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:21 PM2018-09-09T12:21:14+5:302018-09-09T12:22:33+5:30

वनविभागाच्या कार्यालयातच कारवाई

Warrior caught red handed while taking a bribe of 20,000 rupees in Chalisgaon | चाळीसगावला एक लाख २० हजाराची लाच घेतांना वनसंरक्षकास रंगेहाथ पकडले

चाळीसगावला एक लाख २० हजाराची लाच घेतांना वनसंरक्षकास रंगेहाथ पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देमोठी खळबळ प्रादेशिक वनविभागाच्या कार्यालयात सापळा

चाळीसगाव, जि. जळगाव : जप्त केलेले जेसीबी मशिन सोडण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयाची लाच मागणा-या वनसंरक्षक प्रकाश विष्णू पाटील (वय ५०, रा. शाहु नगर, मुळ रा. माहेजी ता. पाचोरा) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवारी रात्री वनविभागाच्या कार्यालयातच करण्यात आली.
वनविभागाच्या कार्यालयातच कारवाई झाल्याने येथे मोठी खळबळ उडाली आहे. चाळीसागाव येथील ३७ वर्षीय तक्रारदाराचे वनविभागात जेसीबी मशिनच्या सहाय्याने मुरुम खोदण्याचे काम सुरु होते. चाळीसगाव प्रादेशिक वनविभागात उपखेड बीटात कार्यरत असलेल्या वनसंरक्षक प्रकाश पाटील याने ते जेसीबी मशिन जप्त केले होते. मशिन सोडण्याच्या बदल्यात त्याने तक्रारदाराकडे एक लाख ६० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर तडजोड करुन एक लाख २० रुपये देण्याचे ठरले. शनिवारी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांच्या पथकाने मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील प्रादेशिक वनविभागाच्या कार्यालयात सापळा लावला. लाचखोर प्रकाश पाटील याला एक हजार २० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. रात्री उशिरा चाळीसगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Warrior caught red handed while taking a bribe of 20,000 rupees in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.