अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्याची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:12 PM2019-10-15T12:12:45+5:302019-10-15T12:13:14+5:30

कपडे फाटेपर्यंत झोडपले

Washing the little girl pierced | अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्याची धुलाई

अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्याची धुलाई

Next

जळगाव : गेल्या आठ महिन्यापासून अल्पवयीन मुलीला त्रास देऊन छेड काढणाºया तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी सोमवारी दुपारी १ वाजता झोडपतच शनी पेठ पोलीस ठाण्यात आणले. विशेष म्हणजे पोलिसांसमोरही त्याची धुलाई झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबांसह राहते. ती नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गल्लीतीलच एक तरुण आठ महिन्यांपासून तिला त्रास देत होता. त्यानंतर शाळेतही जावून तिची छेड काढायला सुरुवात केली होती. अनेकदा शाळेच्या सुरक्षा रक्षकांनी या तरुणाला हटकले.
मात्र यानंतरही तरुणाने हा प्रकार सुरुच ठेवला. नवरात्रोत्सवात तर त्याने कहरच केला. विक्षिप्तपणा व हातवारे करायला लागल्याने त्रास असह्य झाल्यानंतरही मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला नव्हता. शेवटी सोमवारी मुलीने धाडस करुन घरी त्याचे सारे कारनामे कथन केले. त्यानंतर कुटुंबाने त्याचे घर गाठले.
तरुणाच्या कुटुंबियांनी गाठले पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांंनी मुलीशी संवाद साधून नेमक्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. माहिती मिळताच तरुणाच्या आई वडीलांनीही पोलीस ठाणे गाठले. तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
घरुनच झोडपत आणले पोलीस ठाण्यात
गल्लीतील तरुण छेड काढत असल्याचा प्रकार समजल्यावर मुलीचे काका, वडील तसेच नातेवाईकांनी सोमवारी दुपारी तरुणाचे घर गाठले. त्याला घरुनच चोप देत पोलीस ठाण्यात आणले. मारहाणीदरम्यान तरुणाचे कपडे फाटले होते. यावेळी पोलीस ठाण्यात एकच गर्दी जमली होती. संताप अनावर झाल्याने मुलीच्या काकाने पोलीस ठाण्यातही तरुणाला कानशिलात लगावली. नंतर ते निघून गेले.
पलायन केलेल्या प्रेमीयुगुलाला पुण्यातून घेतले ताब्यात
शहरातून दोन दिवसापूर्वी पलायन केलेली अल्पवयीन मुलगी व तिच्या प्रियकराला शनी पेठ पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शुभम शरद बाविस्कर (कोळी) याला अटक करण्यात आली आहे. शनिपेठ परिसरात वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुलगी तसेच तरुण वास्तव्यास आहे. १२ आॅक्टोबरला दोघेही जळगावतून पळून गेले होते. दोघे पुणे रेल्वेस्थानकावर फिरत असतांना तेथील लोहमार्ग पोलिसांना संशय आला. त्यांनी चौकशी केल्यावर दोघेही घरुन पळून आल्याचे पोलिसांना समजले. तेथील पोलिसांनी शनीपेठ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार शनी पेठ पोलिसांनी पुणे गाठून दोघांना ताब्यात घेतले.

Web Title: Washing the little girl pierced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव