पूर्णाड तपासणी नाक्यावर कडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 02:54 PM2020-04-26T14:54:48+5:302020-04-26T14:56:04+5:30
राज्याची सीमा : पायी जाणारे परप्रांतीय अनेक मजूर पडले अडकून
मुक्ताईनगर : पूर्णाड सीमा तपासणी नाक्यावर कोरोना संसर्गाच्या पर्शवभूमीवर राज्यसीमा बंद करण्यात आली आहे. एकही नागरिक मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येऊ नये तसेच परप्रांतीय मजुरांना सीमेवरच रोखण्यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेने कंबर कसली आहे. परप्रांतात पलायन करणाऱ्या मजुरांची काळजी म्हणून आरोग्य विभाग देखील रस्त्यावर उतरले आहे. सीमा तपासणी नाक्यावर रुग्ण तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जीवनावश्यक वस्तूच्या मालवाहू वाहनांच्या माध्यमातून ठीकठिकाणी अडकलेले नागरिक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेश व इतरराज्यात पलायन करीत आहेत. नागरिकांच्या या पलायन साखळीला तोडून कोरोना संसर्गाच्या संभावित धोक्याला रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झाल्या पासून येथे तपासणी नाके सुरू झाले आहे. परंतु नागरिक वेगवेळ्या शक्कल लढवून सीमा ओलांडत आहेत. त्यामुळ्य आता सीमेवर हा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला असून दिवस- रात्र २४ तास खडा पहारा सुरू करण्यात आला आहे.
दोन विशेष पथके
पोलीस बंदोबस्तात जळगाव मुख्यलायचे दोन पथक असून तालुक्यातील चिखली आणि पूर्णाड सीमा तपासणी नाक्यावर नेमणूक करण्यात आले आहे. एक पोलीस उप निरीक्षक आणि ४ कर्मचाऱ्यांचे या प्रमाणे हे एक पथक आहे. महसूल विभागातर्फे तलाठी व मंडळ अधिकारी यांची देखील नेमणूक आहे.
येणाºया जाणाºयांची
कसून चौकशी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यसीमा बंद केल्या असुन मध्य प्रदेशत जाणाला बºहाणपूर रस्त्यावरील आरटीओ जवळ चेक पोस्ट वर येणाºया - जाणाºयांची कसुन चौकशी सुरु आहे. यामुळे आपापल्या गावी पायी जाणारे मजुरांचे टोळके रस्त्यावरच सिमेनजिक अडकुन पडले आहेत. शेजारील बुलढाणा जिल्ह्यात कापसाच्या जिनींगवर कामाले गेलेले तसेच इतर ठिकाणी अडकलेले मजूर पायी घराकडे निघाले आहेत. लहान मुलांबाळांचाही समावेश या मजुरवर्गात आहे. रस्त्याने चालतांना गावांगावांतुन पीठ,तांदुळ खाण्यासाठी मिळत होते मात्र आता ते रस्त्यातच अडकुन पडले आहेत.
गेल्या महिन्या भरात अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या मार्गाने सीमा ओलांडली आहे. दक्षता म्हणून आता सीमा बंदी कठोर करण्यात आली आहे. जीवनावश्यक व तातडीची वाहतूक करणाºया वाहनांचीही कसून तपासणी सुरू आहे.
२४ तास आरोग्य
तपासणी सुरु
आरोग्य विभागाने एक क्लीनिक तपासणी नाक्यावर उघडले असून २४ तास तपासणी सुरू आहे. एक वैद्यकीय अधिकारी आणि ३ कर्मचाºयांचे हे पथक सीमे वरून राहदरी करणाºया अत्यावश्यक वाहनांच्या चालकांची तसेच सीमेवर थोपविण्यात येणाºया परप्रांतीय नागरिकांची तपासणी करीत आहे.