बांधकामावर पाणी मारत असताना तिसºया मजल्यावरुन पडून वॉचमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:32 PM2017-09-23T17:32:22+5:302017-09-23T17:34:21+5:30
मालकांनी मात्र इमारतीवरुन पडल्याचा आरोप फेटाळल
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२३ : बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारत असताना पाय घसरुन तिसºया मजल्यावरुन कोसळल्याने राजेंद्र सिताराम गोपाळ (वय ४५ रा.वावडदा, ता.जळगाव) या वॉचमनचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता विवेकानंद नगरात घडली. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.आर.महाजन यांच्या मालकीचे हे बांधकाम आहे. दरम्यान, अॅड.महाजन यांनी मात्र गोपाळ हे इमारतीवरुन पडल्याचा आरोप फेटाळून लावत ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, सिंधी कॉलनी रस्त्याला लागून असलेल्या विवेकांनद नगरात माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांच्या घराशेजारी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.आर.महाजन यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी राजेंद्र गोपाळ हे वाचमन म्हणून कामाला आहेत.इमारतीच्याच तळमजल्यात पत्र्याचे शेड करुन गोपाळ हे पत्नी बेबाबाई व मोठा मुलगा आनंद यांच्यासह वास्तव्याला होते. शनिवारी सकाळी तिसºया मजल्यावर पाणी मारत असताना त्यांचा पाय घसरला व ते थेट खाली कोसळले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नी व मजुरांनी घेतली धाव
राजेंद्र गोपाळ हे इमारतीवरुन कोसळल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे तळमजल्यावर जेवणाला बसलेल्या दीपक वसंत गोपाळ व गोकुळ सुभाष गोपाळ (दोन्ही रा.वावडदा) या मजुरांनी धाव घेऊन त्यांची पत्नी बेबाबाई यांना बोलावले. गल्लीतील तरुणांच्या मदतीने राजेंद्र यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषीत केले.