२० लाखांच्या सॅनिटायझरमध्ये पानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:16 AM2021-05-22T04:16:29+5:302021-05-22T04:16:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आरोग्य विभागाने जळगाव एमआयडीसीतून खरेदी केलेल्या २० लाखांच्या सॅनिटायझरमध्ये ८० टक्के पाणी आढळून आल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य विभागाने जळगाव एमआयडीसीतून खरेदी केलेल्या २० लाखांच्या सॅनिटायझरमध्ये ८० टक्के पाणी आढळून आल्याचे निदर्शनास आले असून अन्य औषधीही निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करीत याची चौकशी करावी, अशी मागणी जि. प. सदस्य अमित देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत चौकशी करून येत्या चार दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
आराेग्य विभागाकडून रेट कॉन्ट्रॅक्टवर नसलेल्यांकडून खरेदी केल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे. या २० लाखांच्या सॅनिटायझरमध्ये ८० टक्के पाणी असल्याचे तपासणीतच निदर्शनास आले असून हा सर्व भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी याबाबत सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांना शुक्रवारी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. त्यानंतर सहा सदस्यीय समिती याची चौकशी करून अहवाल देईल, असे आदेश सीईओं डॉ. पाटील यांनी दिले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. अधिकांश पानी असलेले सॅनिटायझर वापरून आरोग्य अधिकारी व कर्मचारी गाफील रहातील व त्यांना हे धोकादायक ठरू शकते, व कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता यातून वर्तविण्यात आली आहे. मास्क व अन्य औषध खरेदींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
स्थायीतही गाजला मुद्दा
स्थायी समितीच्या सभेत हे सॅनिटायझर परत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, हे सॅनेटायझर परत न करता, ते आरोग्य केंद्रांना वाटप करण्र्यात आले असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.