साकेगावजवळ जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 07:40 PM2019-04-07T19:40:25+5:302019-04-07T19:41:53+5:30

भुसावळ शहराजवळील साकेगाव महामार्गावर चौपदरीकरणाच्या खोदकामामुुळे जलवाहिनी फुटण्याचे सत्र नियोजनाअभावी सातत्याने सुरूच आहे.

 A water-bathing session has started at Sakegaon | साकेगावजवळ जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच

साकेगावजवळ जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच

Next
ठळक मुद्देखोदकामापूर्वी नियोजन महत्त्वाचेमहामार्गासाठी खोदकाम करताना फुटते जलवाहिनीदोन दिवसातील सातत्याने दुसरी घटना

भुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव महामार्गावर चौपदरीकरणाच्या खोदकामामुुळे जलवाहिनी फुटण्याचे सत्र नियोजनाअभावी सातत्याने सुरूच आहे.
सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम काम करत असताना ज्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आली आहे त्या ठिकाणची तांत्रिक माहिती व जलवाहिनी टाकलेल्या मार्गाची माहिती घेऊन खोदकाम गरजेचे आहे. मात्र नियोजनाअभावी ३०-४० फुटांनंतर नंतर पुन्हा पुन्हा जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच आहे. साकेगाव महामार्गावर बसस्थानक चौकांमध्ये एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी अतिउच्च दाबाच्या जलवाहिनी फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी साकेगाव वाय पॉईंटजवळ जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीची जी जोडणी दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी झाली व त्यानंतर त्याच्या वीस फूट पुढे परत त्याच रांगेत पुन्हा जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटण्याचे सत्र सातत्याने सुरूच आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये हजारो लीटर शुद्ध पाण्याची यामुळे नासाडी होत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचे तळेच्या तळे साचलेले आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यात खोदकाम करताना चार दिवसांपूर्वी साकेगाव बसस्थानकाजवळ उच्च दाबाने जळगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. ती जोडली. त्यानंतर परत वाय पॉर्इंटजवळ नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणारी छोटी जलवाहिनी फुटली. यापुढेही दोन-तीन ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण फिरत असताना हजारो लाखो लीटर पाणी वाया जात आहे. याचे संबंधित त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.
खोदकामापूर्वी नियोजन महत्त्वाचे
महामार्ग चौपदरीकरणासाठी खोदकाम सुरू असून, पुढेही खोदकाम चालू राहणार आहे. ज्या ज्या ठिकाणी जलवाहिनी गेलेली आहे त्या ठिकाणची तांत्रिक माहिती घेऊन व प्लंबरची टीम घेऊन जलवाहिनी चुकून फुटल्यावर लगेच त्याची वेळेवर दुरुस्ती करता यावी यासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जलवाहिनी जरी फुटली तरी वेळेवरच ती जोडली जाईल व पाण्याची नासाडी होणार नाही. यासाठी खोदकाम पूर्वी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title:  A water-bathing session has started at Sakegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.