स्मशानातील पाणी भागवते रुईखेडय़ाची तहान
By admin | Published: April 15, 2017 12:50 PM2017-04-15T12:50:36+5:302017-04-15T12:50:36+5:30
दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याचे स्त्रोत ठप्प पडणा:या रुईखेडा गावाला पाणी टंचाई निवारणार्थ टॅंकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय टंचाई निवारण होत नाही.
Next
मुक्ताईनगर,दि.15- : दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याचे स्त्रोत ठप्प पडणा:या रुईखेडा गावाला पाणी टंचाई निवारणार्थ टॅंकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय टंचाई निवारण होत नाही. अशात गेल्या वर्षी थेट स्मशानभूमीत कूपनलिका केली आणि भरपूर पाणी लागले. मग काय पाण्याचा प्रश्न सोडविण्यास याच कूपनलिकेवरून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सद्यस्थितीला निम्मे गाव या स्मशानातील पाण्यावर तहान भागवत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा या सहा हजार लोकसंख्येच्या गावाला उन्हाळय़ात पाणी टंचाई पाचवीला पुजलेली. गाव परिसरात दर 500 मीटरवर साठवण बंधारे वरच्या भागात तलाव वजा धरण त्यावरच्या भागात वनहद्दीत पुन्हा तलाव अशात वर्षातील 12 महिन्यांपैकी आठ महिने मुबलक पाणी आणि ऐन उन्हाळय़ात विहिरी कोरडय़ा अशी अवस्था असते. उन्हाळय़ात येथे पाण्याचे दुर्भिक्षच गेल्या दहा वर्षात येथे उन्हाळय़ातील पाणी टंचाई निवारणार्थ अनेक उपाययोजना झाल्यात यात विहिर अधिग्रहण, ताप्तुरती पाणीपुरवठा योजना नवीन कूपनलिका ही कामे झालीत पण पाण्याचा प्रश्न सुटलाच नाही. यामुळे उन्हाळय़ात टंचाई निवारणार्थ येथे टँकर लावल्या शिवाय गावाची तहान भागत नाही.
गावात तीन कुपनलिका निकामी ठरल्या आहेत. छोटय़ाशा गावाला सध्या तीन ठिकाणावरून पाणीपुरवठा होत आहे. यात गावातील व कन्ह्यार खेडे शिवारातील विहिर आणि स्मशानभूमीतील कुपनलिकेचा समावेश आहे. गेल्या वर्षी टंचाई निवारणार्थ करण्यात आलेल्या कूपनलिकांपैकी फक्त स्मशानभूमीत करण्यात आलेल्या कुपनलिकेला पाणी लागले. ही कूपनलिका ख:या अर्थाने वैकुंठ धामात अंत्यविधीसाठी लागणा:या पाण्याच्या निमित्ताने करण्यात आली होती. परंतु पाणी इतके लागलेली लोकवर्गणी करून ग्रामस्थांनी याची खोली वाढवली आणि तब्बल साडेबारा हॉर्सपॉवरचा पंप याच्यावर बसविला. विशेष म्हणजे या कुपनलिकेच्या अर्धा कि. मी.अंतरार्पयत एकाही कुपनलिकेला पाणी नाही तर जवळपासच्या विहिरी देखील उन्हाळय़ात आटतात. अवघे गाव पाण्यासाठी भटकंतीत असताना वैकुंठधाम (स्मशानभूमी) तील ही कूपनलिका निम्म्या रुईखेडा गावाला पाणीपुरवठा करीत आहे. दर चौथ्या व पाचव्या दिवशी गावाला येथून पाणीपुरवठा होत आहे. (वार्ताहर)