एस.एस.बी.टी.च्या विद्यार्थीनींनी बनविले ‘वॉटर क्लिनर रोबोट’
By admin | Published: April 28, 2017 02:18 PM2017-04-28T14:18:17+5:302017-04-28T14:19:27+5:30
सौरउर्जेच्या सहाय्याने काम करतो रोबोट : ५ किलो कचरा उचलण्याची क्षमता
Next
आॅनलाईन लोकमत विशेष /अजय पाटील
जळगाव,दि.२८- देशात वाढणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण, कारखानदारीमुळे मोठ्या समस्या निर्माण होत आहे. यामुळे जलप्रदुषणाची समस्या वाढून नदी, सरोवर, तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी एसएसबीटी अभियांत्रिकीच्या अणुविद्यूत शाखेतील विद्यार्थीनींनी सौर उर्जेवर चालणारा ‘वॉटर क्लिनर रोबोट’ तयार केला आहे. या रोबोटच्या मदतीने नदी, तलावातील कचरा काढता येणार आहे.
हे उपकरण उज्वला सोनवणे, शुभांगी दोडे, मोनिका पाटील, वैष्णवी पाटील या चार विद्यार्थिनींनी तयार केला आहे. विभागप्रमुख डॉ.एस.आर.सुरळकर, प्रा.व्ही.एम.देशमुख व ए.एस.वाणी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
अशा प्रकारे काम करते उपकरण
या उपकरणात विद्यार्थीनींनी ‘पॉवर बॅँक’ म्हणून ‘लीड अॅसीड बॅटरी’बसविली आहे. तसेच ‘एटी८९सी५१’ कंट्रोलर आणि रेडिओ टेक्नॉलॉजी वापरली आहे. हे उपकरण एखाद्या पाण्यावर चालणाºया बोटीसारखे आहे. त्यावर डिजीटल कॅमेरा वापरण्यात आला आहे. जो पाण्यावर तरंगणाºया कचºयाची चित्रफीत नदीकिनारी असलेल्या लॅपटॉप पाठवतो आणि मग यंत्रचालक रिमोटने पाण्यात असलेल्या उपकरणाला कमांड देतो. त्यामुळे उपकरणाला दिशा मिळते. हे उपकरण ‘४३३ एमएजझेड’ फ्रिन्वेन्सी वर कार्य करते. उपकरणाला असलेले ‘कॉनरेजर’ हे पाण्यावरचा कचरा उचलून कचरा कुंडीत टाकतो. त्यानंतर यात असलेले लेव्हल सेन्सॉर वाजतो व त्यानंतर यंत्रचालक रोबोटला किनाºयावर आणून कचरा कुंडीत टाकतो.
मेहरूण तलावात होवू शकतो उपयोग
सध्या हे उपकरण ५ किलो पर्यंतचा कचरा संकलित करु शकते. या उपकरणाची कालांतराने अंमलबजावणी केल्यास कचरा संकलनाची क्षमता वाढवून कमीत-कमी वेळेत जास्तीत जास्त कचरा उचलता येईल. अशा प्रकारे या उपकरणाचा वापर शहरातील मेहरुण तलावातील कचरा साफ करण्यासाठी होवू शकतो.