सावदा येथे नदी-नाल्यांमध्ये होणार जलसंधारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 07:30 PM2019-05-12T19:30:59+5:302019-05-12T19:32:13+5:30
‘थेंब अमृता’चा या जलक्रांती अभियानांतर्गत लोकसहभागातून येथील पाताळगंगा नदी व नाल्यांमध्ये जलसंधारण व विहीर पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : ‘थेंब अमृता’चा या जलक्रांती अभियानांतर्गत लोकसहभागातून येथील पाताळगंगा नदी व नाल्यांमध्ये जलसंधारण व विहीर पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
याबाबत येथे दत्तमंदिरात शनिवारी रात्री बैठक पार पडली. यावेळी सुरेशराज मानेकर बाबा, शास्त्री भक्तीकिशोरदास, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, प्रा.व.पु.होले, प्रा.संजय वाघुळदे आदी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी सुहास भंगाळे, सुभाष सरोदे, अतुल नेमाडे, महेश भारंबे, अतुल नेहते, किरण बेंडाळे, प्रमोद भंगाळे, सुहास भंगाळे, सुनील पाटील, सागर चौधरी, पंकज पाटील, अतुल चौधरी, राजू चौधरी, प्रकाश वायकोळे, संजय मिस्तरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भक्ती किशोरदास म्हणाले, आम्ही संत हे अध्यात्मिक सत्संग कथा, प्रवचन खूप केले व करतो. पण आता पाणी बचत करून ते वाचविणे ही काळाची गरज बनली आहे, म्हणून संतांनी पुढाकार घेऊन जलक्रांती अभियान व सत्संग सुरू केले आहे. सुरेशराज मानेकर बाबा, प्रा.वाघुळदे व प्रा.होले यांनी अभियानाची संकल्पना, वाटचाल व संपूर्ण माहिती दिली.
यावेळी पाणी बचतीची शपथ घेण्यात आली व स्वयंसेवकांंची समिती नेमण्यात आली. सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी, तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले.
अभियानाला सावद्यातून अडीच लाखांवर मदत
डॉ.व्ही.जे.वारके यांनी दोन लाख रुपये मदत दिली. याशिवाय किसान दूध संस्थेने १०० लीटर डिझेल, सुहास भंगाळे यांनी दोन दिवस जे.सी.बी.मशीन, तर सुनील पाटील यांनी ११ हजार रुपये, जनकल्याण पतसंस्थेने ११ हजार रुपये, किरण बेंडाळे १०१ लीटर डिझेल देणार असून, रितेश पाटील सहा हजार ६६६ रुपये, अनिल महाजन ५१०० रुपये, डॉ.चंद्रशेखर पाटील अडीच हजार रुपये, नंदू पाटील अडीच हजार रुपये, सचिन बºहाटे अडीच हजार रुपये, योगेश महाजन ११११ रुपये, अनिल नेमाडे ११११ रुपये, प्रकाश भंगाळे १००१ रुपये, प्रवीण पाटील १००१ रुपये दिले. असे मिळून सुमारे अडीच लाखाचे वर आर्थिक सहकार्य करण्यात आले.