धरणगावला ऐन हिवाळयात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 04:23 PM2020-12-01T16:23:26+5:302020-12-01T16:25:34+5:30

ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही.

Water to Dharangaon by tanker in winter | धरणगावला ऐन हिवाळयात टँकरने पाणी

धरणगावला ऐन हिवाळयात टँकरने पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देआधी १३ दिवस आता अठरा दिवस होऊनही पाणी मिळेना  गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही.

धरणगाव : ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला  जात आहे. त्यामुळे एका नगरसेवकाने टॅंकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे, विशषे म्हणजे धरणगाव शहरात सर्व राजकीय पक्षांचे जिल्हास्तरिय पदाधिकारी वास्तव्यास आहेत. तरीही अशी विदारक परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
धरणगाव शहरात कित्येक वर्षापासून पाण्याचे राजकारण सुरु आहे. चांगला पाऊस होऊन देखील तीच परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे. 
 नगरसेवक ललित येवले  हे  स्वखर्चाने  आपल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. पाणीटंचाईची स्थिती तर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येत असते.  उन्हाळ्यात एका टँकरला कमीतकमी ८०० रुपये मोजावे लागत असतात.  तेही खाजगी टँकर दोन किंवा तीन दिवस आधी बुक करावे लागते.  तेंव्हाच पाण्याचे टॅंकर उपलब्ध करुन दिले जाते. 
शहरात  गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाण्यावरच राजकारण  सुरु आहे  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक  संताप व्यक्त करीत आहेत. 
सणासुदीला अनेक लोक मूळ गावी म्हणजे धरणगावला येत असतात. त्यांनाही बाहेरून पाणी आणून भरावे लागत आहे. या ठिकाणी विरोधक मात्र मौन पाळून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 
रोटवद जवळ जलवाहीनी फुटलेली आहे.  त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. आपण स्वतः त्या ठिकाणी तीन दिवसापासून थांबून आहोत. त्या जलवाहिनीला खाली करण्यास तीन दिवस लागतात.  येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल. 
- नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव

 
महिला  दिवसभर  महिला घरी राहतो व पाण्याची भटकंती करत असतो. सकाळी उठल्यापासून तेरात्रीच्या भांडी  धुण्यापर्यँत  आम्ही पाणी शोधत असतो.  गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या कायम आहे. -कल्पना मुसळे, रहिवाशी, धरणगाव
 
 अठरा ते वीस दिवसानंतर आम्हाला पाणी हे मिळत असते मात्र आमच्याकडे पाहुणे आले असून सुद्धा तेही आमच्या सोबत पाणी भरण्याचा मला मदत करत असतात ही आजची धरणगाव ची परिस्थिती आहे.  
-राखी पांडे, रहिवाशी, धरणगाव 

 
पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही. पाण्याच्या प्रश्नावरून जनतेने त्यांना दोन ते तीन वेळेस प्रतिनिधित्व म्हणून निवडून दिले. पालिकेने प्रत्येक वार्डात टँकरने पाणी पुरवले पाहिजे व एवढ्या वर्षापासून सत्ता असूनदेखील पाण प्रश्न  सुटलेला नाही. 
- ललित येवले, नगरसेवक, धरणगाव
 

Web Title: Water to Dharangaon by tanker in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.