अस्पष्ट स्वाक्षरीने स्वप्नांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:16 AM2018-10-21T00:16:57+5:302018-10-21T00:17:14+5:30

अकरा परीक्षार्थींना केवळ अस्पष्ट स्वाक्षरीच्या कारणावरून परीक्षेपासून दूर ठेवण्यात आले

Water with dreams over ambiguous dreams | अस्पष्ट स्वाक्षरीने स्वप्नांवर पाणी

अस्पष्ट स्वाक्षरीने स्वप्नांवर पाणी

Next

सागर दुबे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअरपदासाठी देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली गेली़ यात अकरा परीक्षार्थींना केवळ अस्पष्ट स्वाक्षरीच्या कारणावरून परीक्षेपासून दूर ठेवण्यात आले. ही चूक परीक्षा घेणाऱ्याची असो की कोणाची, यात परीक्षार्थींच्या स्वप्नांवर मात्र पाणी फिरले गेले.
सकाळी परीक्षार्थी केंद्रात येताच पेपर सुरू होणार त्याच्या दहा मिनिटाआधीच त्या ११ विद्यार्थ्यांना परीक्षा हॉल बाहेरच अस्पष्ट स्वाक्षरीच्या नावावर रोखले़ मात्र, त्या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्रावर तर आॅनलाईन अर्जाच्या प्रतवर स्पष्ट स्वाक्षरी असून सुध्दा महिला केंद्र प्रमुखाकडून कुठलेही सहकार्य न मिळाल्यामुळे गोंधळाला सुरूवात झाली़ महिला केंद्र प्रमुखाने परीक्षार्थींचे म्हणणे ऐकूण घेत नेमकी चुक कुणाची हे समजून घेतले असते तर ते ११ परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहिले नसते़
परीक्षा सुरू होण्याआधी हा घोळ समोर येताच परीक्षा केंद्र प्रमुखाने ही समस्या सोडविण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे होते़ मात्र, तसे काहीही झाले नाही़ उलट परीक्षा हॉलचा दरवाजा बंद करत त्या परीक्षार्थींना केंद्राबाहेर वाºयावर सोडले़ एकंदरीत विद्यार्थ्यांच्या या नुकसानास जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे़ अनेक वेळा महाविद्यालयांच्या केंद्रावर परीक्षा होतात त्या वेळी परीक्षार्थी उशिरा आला, प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न अशा विविध समस्या समोर येऊन गोंधळ होत असतात, अन् त्या समस्या सोडविल्या देखील जातात़ मात्र, असे शनिवारी देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात काहीही झाले नाही़ महिला केंद्र प्रमुखाने परीक्षार्थींच्या अडचणी किंवा झालेला प्रकार वरीष्ठांना कळविले नसल्यामुळे त्या परीक्षार्थींना कुठलीही संधी मिळाली नाही़ अनेक वर्षांपासून घेतलेली मेहनतीवर फक्त अस्पष्ट स्वाक्षरीने घात केल्यामुळे अधिकाºयाचे पाहिले स्वप्न त्या परीक्षार्थींचे भंगले़

Web Title: Water with dreams over ambiguous dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.