जल, जंगल, जमीन, जन, जनावर हाच शाश्वत विकासाचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:13 AM2021-07-17T04:13:32+5:302021-07-17T04:13:32+5:30
धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची ...
धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची योग्य तऱ्हने निगा राखल्यास शाश्वत विकास हा निश्चित आहे, असे प्रतिपादन बारीपाडा लोकचळवळीचे प्रणेते चैत्राम पवार यांनी धरणगाव येथे जलदूत फाउंडेशनच्या दत्तक वृक्ष योजनेच्या ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटनप्रसंगी केले.
निसर्ग घटक हे एकमेकांशी पूरक असून, प्रत्येक ठिकाणच्या गरजेनुसार सांगड घालून जल व पर्यावरण संवर्धन केले पाहिजे. ज्यामुळे जन व जनावर या दोन्ही घटकांचा फायदा होतो. जलदूत फाउंडेशनने हाती घेतलेल्या कार्यांची प्रशंसा करत या पद्धतीची चळवळ फाउंडेशनने इतर गावांतही उभी करावी, असे आवाहन पवार यांनी केले. कार्यक्रमाला धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी उपस्थित होते. त्यांनी धरणगाव शहरात लवकरच सर्व सुविधांची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जलदूतचे प्रतिनिधी म्हणून डॉ. पंकज अमृतकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी, सूत्रसंचालन इंजि. सुनील शाह यांनी केले, तर डॉ. सूचित जैन यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते चिंतामणी पार्कच्या मोकळ्या जागेत ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वृक्ष संगोपनाची जबाबदारी ही चिंतामणी पार्क रहिवासी व जलदूत घेणार आहे.
फोटो १७सीडीजे १