पाणी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:29+5:302021-02-05T05:50:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समृद्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समृद्ध गाव स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली.
भटकळ यांनी जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री, नांद्रा प्र.लो., सवतखेडा या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी बुधवारी जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी या स्पर्धेबाबत चर्चा केली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, भूजल विकास यंत्रणेच्या वैज्ञानिक डॉ.अनुपमा पाटील, उपवनसंरक्षक विवेक होशिंगे उपस्थित होते.
या बैठकीत मनरेगा योजना, वृक्ष लागवडीचा बिहार पॅटर्न गावांमध्ये राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी आपण स्वत: ग्रामस्थांशी चर्चा करू, असे आश्वासन देखील दिले. यात अमळनेर तालुक्यातील २७ आणि जामनेरच्या २० गावांकडे लक्ष दिले जाणार आहे.