पाणी असून सिंचनाची समस्या : बंधारे ठरताहेत निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 09:17 PM2019-07-22T21:17:23+5:302019-07-22T21:17:44+5:30
अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी ...
अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
दरवर्षी अत्यल्प होणाºया पावसामुळे पावसाच्या पाण्याचे सिंचन व्हावे यासाठी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’सारख्या मोहिमांमध्ये शासन दरवर्षी निधीची तरतूद करते. पण अनेक ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामांमुळे जलसिंचन होत नसल्याचे वास्तव विविध घटनांतून समोर येत आहे.
बंधारा पाट्यांविना
मारवड शिवारात धानोरा गावाजवळ माळण नदीवर लघुसिंचन विभागातर्फे बंधारा बांधून दोन ते तीन वर्षे झाली. मात्र अद्याप त्या ठिकाणी पाट्या टाकण्यात आलेल्या नाहीत. नाल्यातून पाणी वाहून जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. ज्या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले आहेत तो साध्य होताना दिसत नाही, असा सूर शेतकरीवर्गातून ऐकायला मिळत आहे.
पहिल्याच पावसात गळती
कळमसरे परिसरात यावर्षी भूजल सर्वेक्षण अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी अडविले गेले नाही. त्यामुळे येथील शेतकºयांनी संताप व्यक्त केला असून, तत्काळ दुरुस्तीसह दोषींवर कारवाईची मागणीही केली आहे. शासनाने मंजूर केलेल्या सिमेंट बंधाºयाचे निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याने पाणी अडविले गेलेच नाही, उलट त्यास गळती लागली आहे. बारदान व मातीचा लेप
पावसाळा सुरू होताच पडलेले पाणी बंधाºयाखालून वाहून गेल्याने शेतकºयांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध तक्रार केली. तेव्हा ठेकेदाराकडून गळती होत असलेल्या बंधाºयाला माती टाकून व बारदान लावून दगडांचा भराव टाकला. पण त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे आळखून शेतकºयांनी त्यास विरोध केला. तसेच गळती होत असलेल्या भागाजवळ सिमेंटमिश्रित खडी, रेती टाकण्याची मागणी केली होती. परंतु संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी डोळेझाक केली. त्यामुळे निकृष्ट काम होऊन पाणीच अडविले गेले नाही. सरकारी निधीचा अपव्यय केला म्हणून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कळमसरे येथील शेतकºयांनी केली आहे.