हरताळे शिवारात विहिरींच्या जलपातळी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 06:05 PM2020-09-11T18:05:21+5:302020-09-11T18:08:46+5:30
यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.
चंद्रमणी इंगळे
हरताळा, ता.मुक्ताईनगर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून कमी पावसामुळे येथील तलावात ठणठणाट असताना यंदा मात्र निसर्गाच्या कृपेमुळे चांगला पावसाळा झाल्याने येथील यंदाच्या समाधानकारक पावसामुळे विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली असून, समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून वंचित असलेल्या रब्बी हंगाम अनेक वषार्पासून बंद असताना यंदा पाऊस व विहिरीला पाणी असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली आहे.
येथील शिवारातील धंडार खोरा म्हणून ओळखल्या जाणाºया शेती शिवारातील विहिरींची जलपातळी वाढली असून, हाताने पाणी घेता येईल येथपर्यंत झाली असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त होत आहे.
येथील दंडार खोºयातील अनिल उत्तम काळे यांच्या शेतातील गटनंबर ३५३चा एक यांच्या शेतात विहीर तुडुंब भरलेली आहे. विहीर सुमारे ५० ते ६० फूट खोल आहे व पंधरा-अठराचा घाला असून पूर्ण वीर तुडुंब भरली असल्याचे स्वत: शेतकºयांनी सांगितले.
विहिरीतून हाताने भरा बादली
गेल्या १५-२० वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे विहिरींची पातळी खूपच खोल गेली होती. त्यामुळे परिणामी अनुदानावर असलेल्या विहिरीसुद्धा स्थगिती देण्यात आली होती. मात्र यंदा विहिरींच्या जलपातळीत वाढ झालेली असल्याचे शेतकºयांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयाला यंदाच्या रब्बी हंगामातील फळबाग गह,ू मका, हरभरा आदी पिके घेणे सोयीस्कर झाले आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. ज्या नाल्यांमध्ये थेंबभर पाणी नसायचे ते नालेसुद्धा खळखळून वाहात आहेत. ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या तलावांमध्येसुद्धा पाणी साठरले आहे. यामुळे येथील शेती शिवाराची जलपातळी वाढलेली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.