मुख्य जलवाहिनीवरुन होणारी पाणी चोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 04:18 PM2019-04-04T16:18:01+5:302019-04-04T16:18:07+5:30

पहूर पेठ येथील प्रकार : शेतकऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार

The water from the main water pipeline was stolen | मुख्य जलवाहिनीवरुन होणारी पाणी चोरी पकडली

मुख्य जलवाहिनीवरुन होणारी पाणी चोरी पकडली

Next


पहूर, ता. जामनेर : पहूर पेठ गावाला मोतीआई धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी वरून पाणी चोरी साठी टाकलेली शेतकºयाची पाईप लाईन खोदून काढली. याप्रकरणी पहूर पोलीसात सरंपचांनी तक्रार दिली आहे.
मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी हिवरखेडा रस्त्यावरील श्रीराम दगडू बारी यांच्या शेतातून गेली आहे. या जलवाहिनीला बारी यांनी आपल्या शेतातील पाईप लाईनला जोडून गावात जाणारे पाणी विहिरीत उतरविले आहे. या पाण्यावर बारी यांनी चवळीचे पिक काढल्याचे दिसून येत आहे.
परीसरात पाणी नाही, आणि हे शेत हिरवे कसे ? हे शोधण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तिर्थराज सुरवाडे, शरद नरवाडे,संदीप देशमुख हे गेले असता या शेताकडे गेले असता बारकाईने पाहिल्यावर पाईप लाईन व्दारे होणाºया पाण्याच्या चोरीचा गंभीर प्रकार निदर्शनास आला असून जवळपास दहा बारा वर्षांपासून ही पाणी चोरी होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
प्रत्यक्ष सरंपच यांचे पती रामेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी, सी.एच वाघमारे, उपसरपंच रवींद्र मोरे, भारत पाटील यांनी पाहणी करून पोलीस पंचनामा केला असून पोलीसात तक्रार दिली आहे.
अनाधिकृत नळकनेक्शन तोडणी मोहिम
पेठ गावात मुख्य जलवाहिनीवर अनाधिकृत नळकनेक्शन असल्याने गावात पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत होती. यासाठी पेठ ग्रामपंचायतच्या वतीने सरंपच निता रामेश्वर पाटील, रामेश्वर पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे व ग्रामपंचायत सदस्यांनी अनाधिकृत नळकनेक्शन तोडणी धडक मोहीम हाती घेतली आहे.
आता पर्यंत ८० अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यात आले आहेत. यामुळे पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The water from the main water pipeline was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.