वाढत्या तापमानातही वृक्षारोपण केलेल्या रोपांना देतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 04:27 PM2019-06-05T16:27:19+5:302019-06-05T16:28:07+5:30

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.

Water to plantations planted in growing temperature | वाढत्या तापमानातही वृक्षारोपण केलेल्या रोपांना देतात पाणी

वाढत्या तापमानातही वृक्षारोपण केलेल्या रोपांना देतात पाणी

Next
ठळक मुद्देसावखेडा येथील युवकांचा पर्यावरण पूरक उपक्रमएकता नवयुवक मंडळातील तरुण रोपांना देतात बाटल्यांद्वारे पाणी

योगेश सैतवाल  
सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाही सावखेडा येथील एकता नवयुवक मंडळातील तरुण वृक्षारोपण केलेल्या रोपांना बाटल्यांद्वारे पाणी देतात.
येथील एकता नवयुवक मंडळातील २५ ते ३० तरुणांनी गेल्या वर्षी सातपुड्याच्या पायथ्याशी सुमारे ३०० रोपांचे वृक्षारोपण केले होते. तेव्हापासून या तरुणांनी या वृक्षारोपण केलेल्या झाडांकडे लक्ष देऊन त्यातली काही रोपे जगवली. मे महिन्यातील वाढत्या तापमानातही या तरुण मंडळी टाकाऊ, रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून या रोपट्यांना पाणी पुरवत आहे. त्या अनुषंगाने ही तरुण मंडळी टाकाऊ पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यात पाणी भरून आठ ते दहा दिवसांनी त्या झाडांजवळ ठेवत आहे. जेणेकरून या झाडांभोवती ओलावा टिकून राहील व झाडे नष्ट होणार नाही. तसेच आठ ते दहा दिवसांनी ट्रॅक्टरद्वारे सातपुडा पायथ्याशी जाऊन झाडांना पाणी देत आहेत.
खºया अर्थाने सावखेडा येथील नवयुवक तरुण मंडळांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केल्याने समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्या अनुषंगाने ही २५-३० युवक मंडळी आठ ते दहा दिवसांनी एकत्र येऊन ट्रॅक्टरद्वारे टाक्यांमधून पाणी नेऊन रानातील या झाडांना पाणी पुरवत आहेत.
या तरुणांमध्ये गोपाळ पाटील, नीलेश महाजन, चेतन चौधरी, प्रफुल महाजन, पवन महाजन, हर्षल बढे, प्रांजल महाजन, नीलेश पाटील, रुपेश चौधरी, गौरव महाजन, निखिल महाजन, डालू महाजन, रुपाल महाजन, जयेश बढे, धीरज महाजन, मयूर महाजन, मयूर बढे, अमित महाजन, कल्पेश महाजन, देवेंद्र महाजन व अन्य तरुण मंडळींचा समावेश आहे
तसेच गावांमधील इतर तरुणांनीदेखील या तरुणांचा आदर्श घेऊन ‘झाडे लावा - झाडे जगवा व त्यांचे संगोपन करा’ या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक देश घडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Water to plantations planted in growing temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.