धरणगावातील पाणीप्रश्न पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 06:06 PM2020-12-01T18:06:49+5:302020-12-01T18:08:58+5:30

शहरातील पाणीप्रश्न पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

The water problem in the dam will be ignited | धरणगावातील पाणीप्रश्न पेटणार

धरणगावातील पाणीप्रश्न पेटणार

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपतर्फेे जनआक्रोश मोर्चाचा इशारापाणी वितरण व्यवस्था सुरळीत होईपर्यंत टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात यावा

धरणगाव : शहरातील पाणीप्रश्न पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पाणीप्रश्न न सुटल्यास जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा भाजपने १ रोजी दिला आहे.

भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना पाण्याची समस्या न सुटल्यास नगरपरिषदेवर जनआक्रोश मोर्चा आणला जाईल, असा इशारा दिला. याआधी २६ नोव्हेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चा स्थगित केला. परंतु भविष्यात हीच समस्या कायम राहिल्यास मोर्चाचे आयोजन केले जाईल. 
पाणी वितरण व्यवस्था सुरळीत होईपर्यंत टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली. निवेदन देतेवेळी मधुकर रोकडे, ॲड. वसंतराव भोलाणे, पुनीलाल महाजन, प्रकाश सोनवणे, शहराध्यक्ष दिलीप महाजन, सरचिटणीस सुनील चौधरी, गुलाबराव मराठे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, नगरसेवक ललित येवले, नितीनसिंह बयस उपस्थित होते.

Web Title: The water problem in the dam will be ignited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.