चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गिरणा नदीपात्रात सायंकाळी चार वाजता पाणी पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:43 PM2019-01-15T18:43:54+5:302019-01-15T18:44:59+5:30
गिरणा धरणातून २५ क्युसेस पाणी मंगळवारी सकाळी सहा वाजता सोडण्यात आले. ते चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे सायंकाळी चार वाजता पोहोचले.
Next
ठळक मुद्देगिरणा धरणातून सोडण्यात आलेय २५ क्युसेस पाणीपाणी १२ ते १३ दिवस सोडण्यात येणारगिरणा काठावरील गावांमध्ये व्यक्त केले जातेय समाधान
पिलखोड, ता.चाळीसगाव : गिरणा धरणातून २५ क्युसेस पाणी मंगळवारी सकाळी सहा वाजता सोडण्यात आले. ते चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे सायंकाळी चार वाजता पोहोचले. सदर पाणी १२ ते १३ दिवस सोडण्यात आले असून, सदर पाणी कानळदा जि.जळगाव येथे पोहचणार आहे, अशी माहिती गिरणा धरणाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र बेहरे व उपकार्यकारी अभियंता यांनी ‘लोकमत’ला दिली.
गिरणा धरणाचे दुसरे आवर्तन सुटल्याने गिरणा काठावरील गावांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.