भुसावळ येथील भाजपाच्या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:41 PM2018-11-10T12:41:24+5:302018-11-10T12:42:42+5:30
बुथ प्रमुखांशी चर्चा
Next
भुसावळ : भाजपाची दहा वाजे ची बैठक तब्बल पावणेदोन तास उशिराने सुरू झाली. आय. एम. ए. हॉल येथे आयोजित ही बैठक बंद दरवाजा सुरू करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते. बैठकीस पत्रकारांना बसल्यास मज्जाव करण्यात आला. या बैठकीस मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन अनुपस्थित आहे. बुथ प्रमुखांना निमंत्रित करून त्यांच्याशी या वेळी चर्चा करण्यात आली.