जळगावच्या विकासासाठी 100 कोटींची निधी शासन देणार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 12:52 PM2017-10-02T12:52:48+5:302017-10-02T12:53:29+5:30

जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली.

Water Resources Minister Girish Mahajan's announcement will give 100 crores for the development of Jalgaon | जळगावच्या विकासासाठी 100 कोटींची निधी शासन देणार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा  

जळगावच्या विकासासाठी 100 कोटींची निधी शासन देणार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा  

Next

जळगाव : शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. या 100 कोटी रुपयांसाठी मुख्यमंत्र्यांची संमती असल्याचेही ते म्हणाले. जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून महात्मा गांधी उद्यानाची पुनर्बांधणी व नूतनीकरण करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी या उद्यानात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, महापौर ललित कोल्हे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर गणेश सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

जळगावात लवकरच पाणी विद्यापीठ : अशोक जैन
पाण्यावर निगडीत असलेल्या सर्व ज्ञान शाखांचे अध्ययन करणारे जागतिक दर्जाच्या पाणी  विद्यापीठाची घोषणा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी यावेळी केली.  500 एकरात हे  विद्यापीठ उभाण्यात येणार असून भाऊंची श्रृष्टी, असे या परिसराचे नाव असेल. लवकरच या विद्यापीठाचा भूमिपूजन सोहळा होईल. तसेच जळगावात मेडिकल डायग्नोस्टिक सेंटरच्या निर्मितीची घोषणाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: Water Resources Minister Girish Mahajan's announcement will give 100 crores for the development of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.