पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:56+5:302021-06-01T04:12:56+5:30

रामकृष्ण कोल्हटकर सेवानिवृत्त जळगाव : दि पूर्व खान्देश हिंदी संस्था शिक्षण संचलित प्रताप नगर येथील रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातील ...

Water on the road due to pipeline rupture | पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी

पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी

Next

रामकृष्ण कोल्हटकर सेवानिवृत्त

जळगाव : दि पूर्व खान्देश हिंदी संस्था शिक्षण संचलित प्रताप नगर येथील रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षक रामकृष्ण कोल्हटकर हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा शाळा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

रमेश तायडे सेवानिवृत्त

जळगाव : भादली येथील महात्मा गांधी विद्यालयातील मुख्याध्यापक रमेश तायडे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३० वर्षे सेवा बजावली. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा शाळा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विद्युत खांबावरील फायबर पेटीला आग

जळगाव : शिवाजी नगरात महावितरणतर्फे विद्युत खांबावर काही नागरिकांचे मीटर बसविले असून, त्यावर सुरक्षिततेसाठी फायबर पेटी बसविली आहे. सोमवारी सकाळी अचानक या फायबर पेटीला आग लागून, काही वेळाने ही आग पुन्हा आपोआप विझली. याबबात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांकडे तक्रार केली आहे.

तांत्रिक कामांमुळे रेल्वेगाड्यांना विलंब

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते पाचोरा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रुळांचे तांत्रिक काम सुरू आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला असून, या गाडीने १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने हे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Water on the road due to pipeline rupture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.