बिडगावातील पाण्याच्या नमुण्यांची केली तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2017 12:32 PM2017-06-11T12:32:23+5:302017-06-11T12:32:23+5:30
पथक गावात दाखल: अतिसाराची साथ आटोक्यात
Next
ऑनलाईन लोकमत
बिडगाव,दि.11 : वरगव्हाण पाठोपाठ बिडगावातही अतिसाराची लागण झाली. 40 रूग्णांवर येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दरम्यान येथील अतिसाराची साथ आटोक्यात आली आहे. रविवारी आरोग्य केंद्राच्या कर्मचा:यांनी घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली.
10 रोजी सायंकाळी गावातील काही ग्रामस्थांना उलटय़ा व शौचासचा त्रास होऊ लागला होता. सकाळीही धानोरा आरोग्य केंद्रात तीन चार रूग्ण दाखल केले होते. येथे डॉक्टरांना बोलावुन घेत त्रास होत असलेल्या रूग्णांवर उपचार सुरू केले. तब्बल 40 रूग्णांवर उपचार करण्यात करण्यात आले.
दरम्यान, रविवारी आरोग्य केंद्राचे 15 ते 20 जणांचे पथक बिडगावात दाखल झाले होते. कर्मचा:यांनी गावातील घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली. पाण्यात क्लोरीन टाकण्यात आले. रविवारी अतिसाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही. साथ आटोक्यात आली असली तरी, स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीने काळजी घेणे गरजेचे आहे.