आव्हाणे येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:39+5:302021-04-16T04:15:39+5:30

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. पाण्याच्या टाकीची ...

Water scarcity in Ward No. 1 at Awane | आव्हाणे येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये पाण्याची टंचाई

आव्हाणे येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये पाण्याची टंचाई

Next

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. पाण्याच्या टाकीची विद्युत केबल जळाली असल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनदेखील या तक्रारीची दखलदेखील घेतली गेलेली नाही.

किनोद सरपंच विरोधात अविश्वास ठराव

जळगाव : तालुक्यातील किनोद येथील सरपंच विरोधात ग्रामपंचायतमधील दोन तृतीयांश सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला असून, तत्काळ जिल्हा प्रशासनाने याबाबत ग्रामसभा घेऊन हा अविश्वास ठराव पारित करावा, अशी मागणी किनोद ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

गौर्या पड्याला तहसीलदारांनी दिली भेट

जळगाव : योगी फाउंडेशनतर्फे चोपडा तालुक्यातील सातपुडा परिसरात वसलेल्या गौर्या पाड्याला जलसंधारणाचे काम सुरू असून या कामाच्या ठिकाणी चोपडा येथील तहसीलदार अनिल गावित यांनी भेट दिली आहे. तसेच जलसंधारणाच्या कामाची माहिती घेत जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी आवश्यक ती मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी योगी फाऊंडेशनचे संचालक प्रणील चौधरी उपस्थित होते.

Web Title: Water scarcity in Ward No. 1 at Awane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.