मुक्ताईनगर शहरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:39 AM2019-04-11T01:39:57+5:302019-04-11T01:41:23+5:30

पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.

 Water shortage in Muktainagar city | मुक्ताईनगर शहरात पाणीटंचाई

मुक्ताईनगर शहरात पाणीटंचाई

googlenewsNext
ठळक मुद्देजॅकवेल उघड्या पडल्याचा परिणामशहराच्या पाणीपुरवठ्याला फटकादोन-तीन दिवसाआड होणार पाणीपुरवठाकूपनलिकांचे पाणीही उतरले

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पूर्णा नदी पत्रात पाणी पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. काही भागात अपूर्ण पाणीपुरवठा होत असून, संभाव्य टंचाई लक्षात घेता शहरात दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची दवंडी नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.
दुसरीकडे संभाव्य टंचाईस तोंड देण्यासाठी दोन विहिरी अधिग्रहित करणयात आल्या आहेत तर शहरात ३४ हातपंप करण्यात येणार असून बुधवारी जळगाव भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे दोन पथक शहरात दाखल झाले आहे. या पथका कडून पाहणी अंती हातपंप करण्या साठी संभाव्य ठिकाणे शोधून दिली जाणार आहे. पथकाने ठरवून दिलेल्या ठिकाणावर हातपंप केले जाणार आहेत.
पूर्णा नदीचा विस्तीर्ण जलसाठा असूनही ‘पाणी उशाशी आणि कोरडा घशाशी’ अशी अवस्था शहरात दर वर्षी उन्हाळ्यात असते. गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक दृष्ट्या नियोजनातील अभावामुळे उन्हाळा व पावसाळ्यात शहराला कृत्रिम पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. आजही शहरात पूर्णा नदी सह अन्य ४ ठिकाणच्या विहिरी अशा पाचपेक्षा अधिक उद्भवावरून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काळात तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण पाणीपुरवठा योजना झाली असती तर दरवर्षी येणारे टंचाई संकट टळले असते.
दरम्यान, यंदा पूर्णा पत्रातील जलपातळी झपाट्याने खालावली असून, नदी पात्रात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या सर्वच जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. दर वर्षी नदीपात्रात गाळ मोठ्या प्रमाणात वाढत असून विस्तीर्ण पत्रात पाणी उथळ अवस्थेत आले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. अशात हतनूर धरणातून आवर्तन सोडल्याने पाणी पातळी चिंताजनक स्तरावर घसरली आहे. यातून विहिरींचे जलस्तर प्रचंड खालवले असून शेती शिवारासह गावातील विहिरी टप्प्यावर आल्या आहेत. तसेच कूपनलिकांचे पाणीही उतरले आहे. शहरात अनेक खासगी घरगुती कूपनलिका पाणी उतरल्याने बंद पडल्या आहेत.
शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपंचायती च्या वतीने करण्यात आहे. नळांना तोट्या बसवियाचे आवाहनही नगरपंचायतीने केले आहे.

Web Title:  Water shortage in Muktainagar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.