भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:17 PM2019-03-09T16:17:23+5:302019-03-09T16:18:54+5:30

पिंपरखेड गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच भटकंती करावी लागत आहे, तर काही नागरिक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत.

Water shortage at Pimpkarhed in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे पाणीटंचाई

भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देगावातील विहिरीने गाठला तळनागरिक त्रस्तपाण्यासाठी नागरिकांची भटकंतीकाही नागरिक स्थलांतर करण्याच्या मार्गावर

पिंपरखेड, ता.भडगाव, जि.जळगाव : पिंपरखेड गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच भटकंती करावी लागत आहे, तर काही नागरिक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने गेल्या तीन महिन्यांपासून तळ गाठला आहे. परिणामी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गावाची लोकसंख्या जनणनेनुसार चार हजार २९८ आहे, तर गुरांची संख्या ८६२ आहे. गावात एकूण १४ हातपंप आहेत. त्यापैकी आठ हातपंप बंद, तर सहा हातपंप सुरू आहेत, तेही अतिशय कमी प्रमाणात हातपंपाना पाणी येते. गावात व परिसरातील विहिरींनाही पाणी नाही. त्यामुळे पाण्यासाठी लांब शेतातून तर कोणी बैलगाडीवर टाकी ठेऊन पाणी आणत आहेत.
प्रशासनाकडे लेखी व तोडी निवेदन देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनातून गावासाठी एक कोटी १५ लाख मंजूर झाले आहे. मात्र मंजुरीसाठी मंत्रालयात फाईल धुळखात पडली आहे.
पिंपरखेड गावी पाणी पाहणी करण्यासाठी ७ रोजी तहसीलदार गणेश मरगळ, उपअभियंता पवार यांनी पाहणी केली. त्यांनी दुष्काळी गावाला टँकर लवकरच सुरू करू व वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या अहवाल वरिष्ठ पातळीवर मंजूर झाल्यावर गावाला पिण्यासाठी टँकर मिळणार आहे.
गावातील हिरालाल बाजीराव पाटील हे त्यांनी त्यांच्या विहिरीवरुन एक इंच पाईप टाकून नागरिकाना दररोज आपल्या घरी तीन ते चार ड्रम पाणी मोफत देत आहेत. मात्र त्यांच्या विहिरीनेही तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ळे मोठी चिंता निर्माण झाली आहे.
पिंपरखेड गावात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मात्र प्रशासन काहीच करीत नाही. ह्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रमोद मधुकर भोसले हे ११ मार्च रोजी पिंपरखेड ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार आहेत. त्यांनी निवेदनाच्या प्रति गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांना दिल्या आहेत.
गावात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. लवकरच पाणी प्रश्न मिटेल.
-गजानन नन्नवरे, ग्रामविकास अधिकारी, पिंपरखेड

पिंपरखेड गावाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ११ मार्चपासून बेमुदत उपोषणा करणार आहे. पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे.
-प्रमोद भोसले, माजी उपसभापती, पं.स., भडगाव

गावातील विहिरीने तळ गाठला आहे. प्रशासनाकडे पिण्यासाठी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे.
-सुशीला राजू भिल, सरपंच, पिंपरखेड, ता.भडगाव

गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पण लवकर मार्ग निघेल.
-भागाबाई रामकृष्ण माळी, उपसरपंच, पिंपरखेड, ता.भडगाव

Web Title: Water shortage at Pimpkarhed in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.