शिरूड, मंगरूळ येथे पाणी टंचाई

By admin | Published: February 22, 2017 12:15 AM2017-02-22T00:15:16+5:302017-02-22T00:15:16+5:30

अमळनेर : बोरी नदीत पाणी न सोडल्यास,ग्रामस्थांसह धरणावर जाऊन दरवाजे उडण्याचा सरपंचाचा इशारा

Water shortage at Shirud, Mangalore | शिरूड, मंगरूळ येथे पाणी टंचाई

शिरूड, मंगरूळ येथे पाणी टंचाई

Next

अमळनेर : तालुक्यातील मंगरुळ व शिरुड गावाच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी आटल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बोरी नदीला पाणी न सोडल्यास ग्रामस्थांसह धरणावर जावून दरवाजे उघडणार किंवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही गावच्या सरपंचांनी दिला आहे.
तालुक्यातील मंगरुळ व शिरुड या गावांना हिंगोणे, फापोरे शिवारातून बोरी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. बोरी नदीच्या पात्रात या गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. यंदा पावसाळा कमी झाल्याने भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे विहिरी आटल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातच ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. तामसवाडी धरणाचे पाणी पारोळा तालुक्यातील शेतीसाठी राखीव ठेवल्याने पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी कोळपिंप्री शिवारापर्यंत न पोहोचल्याने विहिरी भरु शकल्या नाहीत. बहादरपूर येथे पाट्या टाकून पाणी अडविण्यात आले होते. संतप्त ग्रामस्थांनी त्या पाट्या काढल्या. मात्र तरीही पाणी विहिरींपर्यंत न आल्याने टंचाईची झळ पोहोचली आहे. बोरी नदीतून आणखी पाणी सोडण्यात यावे, अन्यथा दोन्ही तीनही गावांचे ग्रामस्थ मिळून बोरी धरणावर जावून दरवाजे उघडू किंवा अमळनेर तहसीलसमोर तरी तीव्र आंदोलन  करु असे मंगरुळचे सरपंच अनिल अंबर पाटील यांनी सांगितले.
धरणात मर्यादीत साठा शिल्लक असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. मंगरुळ आणि शिरुड गावांना टँकरने पाणी पुरवठा करणे अशक्य  असल्याचे अनिल पाटील व शिरुडचे सरपंच महेंद्र पाटील म्हणाले. शेतीचे राखीव पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी द्यावे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी महत्वाचे आहे. पाणी टंचाईबाबत आणि आरक्षणाबाबत प्रस्ताव पाठवले  जातात. मात्र ते स्वीकारले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.
गिरणेचे पाणी जर बोरी धरणात सोडले तर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होवून अमळनेर व पारोळा तालुक्यातील काही गावांची पाणी समस्या सुटू शकते.त्याचप्रमाणे मेहेरगाव येथेही पाणी टंचाई भासत असून विहीर अधिग्रहणाचे आदेश  दिले आहेत. कुºहे येथेही पाणी टंचाई भासत आहे.  तीनपैकी एक विहीर कोरडी झाली आहे. दोन विहिरींमध्ये पुनर्भरणाचे पाणी असल्याने ते पाणी पिण्यायोग्य नाही असे गावकºयांचे म्हणणे आहे. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांना पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले.(वार्ताहर)
धानोरा, भोरटेक येथे टंचाईवर मात करण्यासाठी विहिर अधिग्रहणाचे आदेश दिले आहेत. अधिग्रहीत विहिरींपासून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन ग्रा.प.ने टाकावी किंवा  तसा प्रस्ताव तातडीच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत सादर करावा अस तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.
४कावपिंप्री, इंदापिंप्री येथेही तीव्र पाणी टंचाई भासत आहे. या गावाची पाणी पुरवठा योजनेची विहीर जवळच असलेल्या ‘बोडी गाय’ धरणात आहे. मात्र यंदा पावसाचे पाणी कमी असल्याने हे धरण आटले आहे.

Web Title: Water shortage at Shirud, Mangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.