बापरे... जलसाठा गतवर्षापेक्षाही कमी! तापमान कमी असतानाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 01:10 PM2023-03-29T13:10:38+5:302023-03-29T13:11:25+5:30
२८ मार्च २०२२ आणि २८ मार्च २०२३ या जलसाठ्याची आकडेवारी पाहता गेल्यावर्षाच्या तुलनेत साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
- कुंदन पाटील
जळगाव : जिल्ह्यातील १३ जलप्रकल्पातील साठा गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे. या प्रकल्पांपैकी केवळ गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात आली आहे. यंदा मार्च महिन्यात तापमान नसतानाही प्रत्येक प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
२८ मार्च २०२२ आणि २८ मार्च २०२३ या जलसाठ्याची आकडेवारी पाहता गेल्यावर्षाच्या तुलनेत साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदा गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठा कमी होणे अपेक्षित आहे. मात्र हतनूर, वाघूरसह अन्य प्रकल्पांतील जलसाठा सुरक्षित असतानाही यंदा तो कमी झाल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी भोकरबारी धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. यंदा मात्र हा साठा केवळ ४.९३ टक्के आहे.बोरीतील जलसाठा गेल्यावर्षी ४२ टक्के होता.यंदा मात्र तो २६ टक्के इतकाच शिल्लक आहे. गिरणा धरणातील साठाही ३२.५४ टक्के शिल्लक आहे. गेल्यावर्षी सर्वच प्रकल्पातील साठा ६० टक्के होता. यंदा मात्र ५१ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.
प्रकल्पातील गतवर्षाची व यंदा असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी
प्रकल्प २०२२ २०२३
हतनूर ६७.०६ ६५.८८
गिरणा ४८.३५ ३२.६४
वाघूर ८५.६३ ७६.४६
सुकी ६९.१७ ७२.६२
अभोरा ७०.४४ ७२.३९
मंगरुळ ५७.३६ ६२.१२
मोर ७४.२२ ७३.७६
अग्नावती ४०.६० ३१.३७
हिवरा २८.४७ ३०.४६
बहुळा ५६.५५ ४२.२५
तोंडापूर ५८.२७ ५६.०९
अंजनी ६०.९९ ३४.९९
गूळ ६१.५७ ७४.४२
भोकरबारी ३२.८९ ४.९३
बोरी ४२.१२ ३३.४९
मन्याड ३९.१३ ३३.४९
एकूण ६०.६९ ५१.०४