पाचोरा तालुक्यात २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:05 PM2019-06-17T16:05:16+5:302019-06-17T16:13:56+5:30
पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
श्यामकांत सराफ
पाचोरा, जि.जळगाव : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तेव्हा पाणीपुरवठ्याचे दुर्भिक्ष्य भयानक अनुभवायला मिळत आहे.
पाचोरा तालुक्यात टँकरने २६ गावांना २४
टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यात लासुरे- ( १ टँकर १२ हजार लीटर) सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रूक -(१ टँकर दोन फेऱ्याा २४ हजार लीटर), वाणेगाव - (१ टँकर १२ हजार लीटर), निंभोरी खुर्द व बुद्रूक -(१ टँकर २ फेºया) राजुरी खुर्द बुद्रूक -( १ टँकर ३फेºया), शिंदाड -(२४ हजारांचे १ टँकर २ फेºया व १२ हजाराचे ४ फेºया), भोरटेक खुर्द (१२ हजार लीटर १ टँकर २ फेºया), खाजोळा- १२ हजारांच े१ टँकर ३ फेºया), वडगाव जोगे (१२ हजारांचे १ टँकर) शहापुरा--(१२ हजारांचे १ टँकर), लोहारा (२४ हजारांच्या २ टँकरच्या प्रत्येकी ३ फेºया ), कासमपुरा (१२ हजाराचे २ टँकर्स प्रत्येकी २ फेºया), वरखेडी (१२ हजारांचे २ टँकरच्या प्रत्येकी २ फेºया), वडगाव कडे- १ टँकर ३ फेºया) भोकरी (१ टँकर ३ फेºया), टाकळी बुद्रूक (१ टँकर २ फेºया), वाडी (१ टँकर २ फेºया), शेवाळे (१ टँकर २ फेºया), पिंप्री खुर्द प्र.पा. (१ टँकर २ फेºया), सारवे बुद्रूक प्र.लो. (१ टँकर), भोजे (२ टँकर २ फेºया),
याप्रमाणे दररोज खडकडेवळा येथील हिवरा प्रकल्पातून २६ गावांसाठी टँकर्सने पाणी उचलले जात असून, भोरटेक व खाजोळा गावासाठी दिघी धरणातून पाणी उचलले जाते.
दरम्यान, खडकदेवळा येथील हिवरप्रकल्पच जेमतेम पाणीपुरवठा करीत असून धरणात मृत साठाच शिल्लक आहे. त्यातही शेतकरी मृत साठ्यातच मोटारी टाकून पाण्याची बिनधास्त चोरी करीत असल्यचे चित्र आहे.
एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना शेतीसाठी थेट पाण्यात जलपरी मोटारी टाकून पाणी उचलले जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असून आहे. ते पाणी चोरीला जात आहे. अजून पाऊस पडला नाही. अद्याप महिनाभर पाणीपुरवठा करणे आवश्यक असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढादेखील साठा शिल्लक नाही. यामुळे शासन टँकरने कुठून पाणीपुरवठा करेल याविषयी तालुका प्रशासनास चिंता पडली आहे. पाटबंधारे विभागाने पाणीचोरी थांबवावी तरच काही दिवस तहान भागेल अन्यथा पाण्यावाचून तालुकावासीयांचे हाल होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.