बोदवडला तब्बल २५ दिवसांनी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:27+5:302021-06-06T04:13:27+5:30

बोदवड : शहरात नळांना तब्बल २५ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागत असते. या ...

Water supply to Bodwad after 25 days | बोदवडला तब्बल २५ दिवसांनी पाणीपुरवठा

बोदवडला तब्बल २५ दिवसांनी पाणीपुरवठा

googlenewsNext

बोदवड : शहरात नळांना तब्बल २५ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागत असते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्यासाठी सामाजिक दायित्वातून काही संस्था शहराला टँकरने पाणी देत आहेत. तर काहींनी आपल्या खासगी कूपनलिका सुरू ठेवून मदतीचा हात पुढे केला आहे.

गुरांसाठी विकतचे पाणी

नागरिकांना जेथे पिण्याच्या पाण्यासाठी हाल भोगावे लागत आहे, तेथे गुरांचा प्रश्न तर खूपच गंभीर असेल हे सांगायला नको. शहरात तीन ते चार हजारांवर पशुधन असून त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शहराच्या हद्दीतील हौदात दररोज वीस हजार लिटर पाणी पदरमोड करून भरले जात आहे. अरविंद जैन यांनी पदरमोड करत हे काम सुरु ठेवले असून त्यांना दिवसाकाठी पाच हजारपर्यंतचा खर्च पडत आहे.

१५ दिवसाआडचा पाणीपुरवठा २५ दिवसांवर

शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या ओडीएच्या गळतीने गेल्या पंधरा दिवसाआडच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनाला आता तब्बल २५ दिवसांवर नेऊन ठेवले असून तालुक्यातील इतर गावांना नियोजनानुसार पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र शहरात पाण्याचा थेंब नाही.

टँकरचे पाणी न परवडणारे

शहरात पाणीटंचाई तीव्र असताना देखील नगरपंचायतने टँकर सुरु करण्याची तसदीही घेतलेली नाही. तर गतवर्षी केलेल्या लाखो रुपये खर्चाच्या कूपनलिकांची देखभालही केली नाही. नियोजन नसल्याने पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले. नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. शहरात अनेक ठिकाणी पाण्यासाठी जिकडे पाणी मिळेल तिकडे धावत आहेत. खासगी टँकर हे ३०० रुपयात ५०० लिटर पाणी मिळत असून ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे.

महिला पतसंस्थेचा पुढाकार

शहरातील धनश्री महिला पतसंस्थेनेही पाणी टंचाईतून सावरण्यासाठी त्यांची खासगी मालकीची बोअरवेल सुरू केली असून मोफत पाणी वाटप सुरू केले आहे. पत संस्थेचे दोन कर्मचारी दररोज पाणी वाटप करण्यासाठी हजर असतात.

शहरातील खासगी धनश्री पतसंस्थेचे कर्मचारी पाणी वाटप करताना. (गोपाल व्यास)

Web Title: Water supply to Bodwad after 25 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.