वीजबिल न भरल्याने पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:46+5:302021-06-23T04:12:46+5:30
सुमारे एक कोटी रुपयांच्या वर या योजनेचे वीजबिल थकले आहे, या कारणांमुळे १७ जूनपासून वीजपुरवठा खंडित केला आहे. बिल ...
सुमारे एक कोटी रुपयांच्या वर या योजनेचे वीजबिल थकले आहे, या कारणांमुळे १७ जूनपासून वीजपुरवठा खंडित केला आहे. बिल न भरल्याने अजून पुरवठा सुरू न झाल्याने जनतेला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
या योजनेवर आडगाव, कासोदा, तळई, जवखेडा, वनकोठा, बांभोरी, वसाका वसाहत आदी गावे मिळून एक लाखाच्या वर लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे.
कोरोनाकाळात गेलेला रोजगार, जून संपण्यात आला तरी पाऊस न पडल्याने रोजगार न उपलब्ध होणे, त्यामुळे पंचायतीचा कर वसूल होण्यासाठी अडचणी येत असल्याचे या योजनेअंतर्गत येणाऱ्या सरपंचाचे म्हणणे असून शासनाने या वेळी वीजबिलांची सक्ती न करता पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
उन्हाळा संपला, जून पण येत्या ७-८ दिवसांत संपणार आहे, विहिरींची पाणीपातळी अत्यंत खालावलेली आहे, त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी मात्र जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
===Photopath===
220621\img-20210622-wa0255~2.jpg
===Caption===
कासोदा-पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने जनता कासावीस