पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचे हाल

By Admin | Published: January 7, 2017 01:02 AM2017-01-07T01:02:47+5:302017-01-07T01:02:47+5:30

दोन दिवसांनी सुरळीत होणार रोटेशन : तापीच्या बंधा:यात पोहोचले पाणी

Water supply disrupted; | पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचे हाल

पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचे हाल

googlenewsNext



भुसावळ : हतनूर धरणातून उशिराने आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासीयांना ऐन हिवाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आह़े आवर्तनाचे पाणी तापीच्या बंधा:यात पोहोचले असलेतरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आह़े तो र्पयत नागरिकांना भटकंती करावी लागणार आह़े
पाटबंधारे विभागाने वेळीच दखल घेत आवर्तन सोडले असतेतर नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली नसती मात्र नेहमीच आवर्तन सोडताना दिरंगाई होत असल्याचा फटका शहरवासीयांना सोसावा लागत आह़े
पाण्याअभावी पंप बंद
शहराला हतनूर धरणातून पाणी पुरवठा होतो त्यासाठी 12़31 दलक्षमी पाण्याचे आरक्षण आह़े धरणातून पाणी तापीच्या बंधा:यात पोहोचल्यानंतर तेथून पाण्याची उचल केली जाते मात्र तापीच्या वरच्या व खालच्या बंधा:यात पाणी संपल्याने ज्ॉकवेल उघडे पडल्याने सुमारे आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता़ बुधवारी रात्री बंधा:यात पाणी पोहोचल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास रॉ वॉटर हाऊसमधील पंप सुरू करण्यात आला़ साधारण प्रती तासाला 1150 क्यूबिक मीटर पाण्याची उचल केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितल़े
पाण्यासाठी भटकंती
पालिकेने पंप बंद केल्यानंतर तब्बल आठ दिवसांपासून शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आह़े शहरातील अनेक भागात पाणी न आल्याने महिलावर्गाला वणवण करावी लागली.
शहर पालिकेच्या विहिरीवर विविध खाजगी वाहनांद्वारे नागरिकांकडून पाणी भरले जात असल्याचे चित्र होते शिवाय काही आजी-माजी नगरसेवकांनीदेखील आपापल्या परीने प्रभागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आल़े 
15 दिवसांनी सोडावे आवर्तन
4हतनूर धरणातून दर 21 दिवसांनी सोडण्यात येणारे आवर्तन दर 15 दिवसांनी सोडल्यास नागरिकांचे हाल होणार नाहीत, मात्र त्यासाठी पाटबंधारे विभागाने दखल घेणे गरजेचे आह़े
काही भागात आले पाणी
4गुरुवारी चमेली नगर, वांजोळा रोड, वसंत टॉकीज, म्युनिसिपल पार्क भागात पाणी आले तर शुक्रवारी तापी नगर, लोखंडी पूल येथे पाणी येईल़
4शहरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असल्याने पालिकेने शहरातील जुन्या विहिरी पुर्नजिवीत केल्यास त्या-त्या भागातील पाणीप्रश्न निश्चित सुटणार आह़े शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे जिवंत स्त्रोत असलेल्या विहिरी असून त्यांची स्वच्छता केल्यास पाणी पिण्यायोग्य होवून त्यामुळे टंचाईवर काही अंशी मात करता येणे शक्य होणार आह़े मुख्याधिकारी यांनी याबाबत नियोजन करून शहरातील विहिरींची नोंद घेऊन त्या विहिरी अधिग्रहीत करण्याची गरज आह़े
4शहरातील अनेक भागात हातपंप असलेतरी केवळ त्यांची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने ते बंद पडले आहेत़ पालिका प्रशासनाने त्याबाबत दखल घेतल्यास शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आह़े पाणी उशाला अन् कोरड घशाला असा प्रकार शहरात सुरू आह़े

Web Title: Water supply disrupted;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.