बोदवडमध्ये 12 दिवसाआड पाणी पुरवठा तरी पाणी गळती दुरस्तीबाबत अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2017 01:54 PM2017-05-03T13:54:55+5:302017-05-03T13:54:55+5:30
बोदवड शहरात तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहे. 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
Next
बोदवड, जि.जळगाव, दि.3- बोदवड शहरात तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहे. 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना मुख्य रस्त्यावरील पाणी गळती थांबविण्याबाबत नगरपरिषदेची अनास्था दिसून येत आहे.
बोदवड शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई असल्याने 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र शहरातील ग्राम दैवत रेणुका देवी जवळील मुख्य पाईप लाईनमधून सकाळी सात वाजेपासून पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. हजारो लिटर पाणी वाया जात असताना त्याची दखल नगरपरिषद किंवा लोकप्रतिनिधींकडून घेण्यात आलेली नाही. मात्र समोरच असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा करणा:या नळाजवळ महिला व नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी रांग लावलेली होती.