निमखेडी शिवारातून पाणी पुरवठा अभियंत्यांची कार लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:39 PM2020-10-19T21:39:24+5:302020-10-19T21:40:05+5:30
जळगाव : जि.प. पाणी पुरवठ उपअभियंता रमेश पिंतांबर वानखेडे (वय ४८) यांची घरासमोर पार्कींग केलेली दीड लाख रुपये किमतीची ...
जळगाव : जि.प. पाणी पुरवठ उपअभियंता रमेश पिंतांबर वानखेडे (वय ४८) यांची घरासमोर पार्कींग केलेली दीड लाख रुपये किमतीची कार चोरट्यांनी निमखेडी शिवारातून लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमखेडी शिवारातील शिवधाम अपार्टमेंट,येथे रमेश पिंताबार वानखेडे हे परिवारासह वास्तव्यास आहेत. ते एरंडोल येथे जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठा विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. १५ रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी अपार्टमेंटजवळील मोकळ्या जागेत त्यांच्या मालकीची एम.एच.१९ सीएफ ००१२ ही कार उभी केली होती. याच कारच्या शेजारी त्यांनी त्यांच्या ऑफिसचीही कार उभी केली होती. १६ऑक्टोंबर रोजी सकाळी वानखेडे हे नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघाले. घराबाहेर आल्यावर त्यांना ऑफिसची कार उभी होती. मात्र वानखेडे यांच्या स्वतःच्या मालकीची कार दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजूला सर्वत्र शोध घेतला, त्यांना कार कुठेही मिळून आली नाही. कार चोरट्यांनी लांबविल्याची खात्री झाल्यावर त्यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.